दररोज सकाळी हे बुलेटिन प्रसारित केलं जातं. एबीपी माझाच्या या बुलेटीनमध्ये दररोज सकाळी राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, मनोरंजन, क्रिडा विश्वातील महत्त्वाच्या दहा बातम्यांचा आढावा घेतला जातो...
१. महात्मा गांधींबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या कालीचरण महाराजाला अटक, मध्य प्रदेशातल्या खजुराहोजवळच्या बगेश्वर धाममध्ये रायपूर पोलिसांची कारवाई
महात्मा गांधींवर वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या कालिचरण महाराजला अटक करण्यात आली आहे. कालीचरण महाराजाविरोधात छत्तीसगड, महाराष्ट्रात गुन्हे दाखल करण्यात आले होते. मध्य प्रदेशमधील खजुराहो येथील बगेश्वरी धाम येथून पहाटे चार वाजण्याच्या सुमारास अटक करण्यात आली. छत्तीसगड पोलिसांनी ही कारवाई केली आहे. छत्तीसगडची राजधानी रायपूरमध्ये कालीचरण विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर ही कारवाई झाली.
काही दिवसांपूर्वी रायपूर येथे झालेल्या धर्मसंसदेत कालीचरण याने महात्मा गांधी यांची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसेचे गोडवे गायले होते. या वक्तव्यावरून कालीचरणविरोधात संतापाची लाट उसळली होती. त्यानंतरही त्याने आपले वादग्रस्त वक्तव्य करणे सुरूच ठेवले होते. कालीचरणविरोधात रायपूर, अकोला आणि पुण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. मागील काही दिवसांपासून छत्तीसगड पोलिसांकडून कालीचरण महाराजाचा शोध सुरू होता. त्यासाठी महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातही छत्तीसगड पोलिसांनी शोध घेतला होता. त्यानंतर खजुराहो येथील बागेश्वर धाम येथील एका घरातून कालीचरणला अटक करण्यात आली. या कारवाईबाबत छत्तीसगड पोलिसांनी गुप्तता बाळगली असल्याचे सुत्रांनी सांगितले.
२. राज्यपाल नाराज झाले ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं पत्र माझाच्या हाती, पत्रातून राज्यपालांना अभ्यासाचे सल्ले आणि निर्णयासाठी अल्टिमेटम
३. नितेश राणेंना जामीन मिळणार की अटक होणार? न्यायालयाच्या निर्णयाकडे नजरा, सिंधुदुर्गात राजकीय नाट्याच्या पार्श्वभूमीवर आज जिल्हा बँकेची निवडणूक
४. मुंबईसह राज्यात काल कोरोना रुग्णांच्या संख्येत दुप्पट वाढ, ओमायक्रॉनच्या रुग्णांतही भर, आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्बंधांवर चर्चा होणार
५. 15 वर्षांवरील मुलांच्या लसीकरणात दहावी-बारावी बोर्डाच्या विद्यार्थ्यांना प्राधान्य द्या, बोर्डाच्या अध्यक्षांची सरकारकडे मागणी
६. 2019 मध्ये सत्तेत सोबत येण्यासाठी नरेंद्र मोदींनी ऑफर दिली होती, शरद पवारांचा गौप्यस्फोट, अजित पवारांना आपण पाठवलं नसल्याचीही स्पष्टोक्ती
७.मुंबईतील दहिसरमध्ये SBIमध्ये भरदिवसा दरोडा प्रकरण, 2 संशयितांना अटक, घटनेचं थरारक CCTV फुटेज समोर
८. मुघल आक्रमक नव्हे तर राष्ट्रनिर्माते, अभिनेते नसिरुद्दीन शाह यांचं वक्तव्य, भारतात 20 कोटी मुस्लिम आहेत याचा विसर नको, शाहांच्या वक्तव्यानं वाद वाढण्याची शक्यता
९.उद्या कर्नाटक बंद; महाराष्ट्र एकीकरण समितीवर बंदीची मागणीसाठी कन्नट संघटना आक्रमक
१०. दक्षिण आफ्रिकेविरोधात सेंच्युरियन कसोटीत भारत विजयापासून सहा विकेट दूर, दक्षिण आफ्रिकेसमोर 211 धावा करण्याचं आव्हान