Weight Loss Exercises : वजन कमी करण्यासाठी लोक जिममध्ये जाऊन वर्क-आऊट (Workout) करतात. अनेकांचे वजन जिममध्ये बराच वेळ वर्क-आऊट करून देखील कमी होत नाही. जर असं होत असेल तर तुम्ही वर्क-आऊट करताना काही चुका करत आहात. जाणून घेऊयात वर्क-आऊट करताना कोणत्या चुका टाळाव्यात-
प्रोटिन शरीरासाठी अत्यंत महत्वाचे आहे. वर्क-आऊट केल्यानंतर शरीराच्या मसल्ससाठी प्रोटिन युक्त पदार्थ खावेत. पण जर तुम्ही प्रोटीन ड्रिंक्स वर्क -आऊटनंतर जास्त प्रमाणात पित असाल तर तुमचे वजन कमी होणार नाही. वर्क-आऊट झाल्यानंतर योग्य प्रमाणात प्रोटिन ड्रिंग्स प्यावेत. शरीरातील कॅलरीज बर्न करण्यासाठी तसेच बॉडी फॅट कमी करण्यासाठी रोज 30 ते 40 मिनीट वर्क-आऊट केला पाहिजे. पण जास्त वेळ वर्क-आऊट केल्याने शरीरात थकवा जाणवू शकतो.
जर तुम्हाला वेट लॉस करायचं असेल तक फक्त कार्डियो वर्क-आऊटवर अवलंबून राहणे योग्य नाही. स्ट्रेंथ ट्रेनिंग एक्सरसाइज आणि कार्डिओ वर्क-आऊट हे दोन्ही करावेत.
अनेक वेळा आपण जेवणाची टेस्ट चांगली असेल तर जास्त प्रमाणात जेवतो. पण जास्त खाल्याने शरीरातील कॅलरीज वाढतात. आणि त्यामुळे वजन देखील वाढते. त्यामुळे जेवण जास्त प्रमाणात करू नये. प्रमाणात जेवल्याने तुमच्या शरारीची चरबी वाढणार नाही.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Good Health Care Tips : लिंबाचं अतिसेवनही अपायकारक; उद्भवतील 'या' समस्या
- Skin Care Tips: थंडीत त्वचा कोरडी पडते? मध आणि गुलाब पाण्याचा हा फेस पॅक चेहऱ्याला लावा, जाणून घ्या तयार करण्याची सोपी पद्धत
- Winter Health Care: थंडीत 'या' 5 गोष्टींचा आहारात समावेश करणं ठरेल फायदेशीर; जाणून घ्या फायदे
- Good Health Care Tips : ग्लोइंग अन् हेल्दी स्किन हवीये? घरच्या घरी करा फेशिअल, 'या' स्टेप्स फॉलो करा