Sputnik Light Vaccine : स्पुटनिक लाईट सिंगल डोस लस  देशात डिसेंबर महिन्यात उपलब्ध होणार आहे. रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंडचे सीईओ किरिल दिमित्रीव यांनी माहिती दिली.  स्पुटनिक लाइट लसीच्या तिसऱ्या टप्प्याच्या चाचणी सुरू आहे. या महिन्याच्या अखेरपर्यंत चाचणीचा निकाल ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (DCGI) देण्यात येणार आहे. परवानगी दिल्यानंतर डिसेंबर महिन्यात लस उपलब्ध होणार आहे. 


स्पुटनिक लाइट ही सिंगल डोस कोविड -19  लस रशियामध्ये बनली आहे. मेडिकल जर्नल द लॅन्सेटमध्ये असे म्हटले होते की, कोविड - 19 विरूद्ध स्पुटनिक लाईटची ही लस 78..6 ते 83.7 टक्के प्रभावी आहे. जे की दोन डोस लसींपेक्षा जास्त आहे. स्पुटनिक- V मध्ये स्पुटनिक लाइटमध्ये समान घटक वापरले जातात आणि चाचणी दरम्यान भारतीय लोकसंख्येवरील सुरक्षा आणि प्रतिकारशक्ती बाबतचा डेटा समोर आला आहे.


 






अर्जेंटिनामध्ये, सुमारे 40 हजार नागरिकांचा स्टडी केला गेला. या स्टडीनुसार, स्पुतनिक लाईट लस रुग्णालयात दाखल होण्याची शक्यता 82.1-87.6 टक्क्यांनी कमी करते. विशेष म्हणजे, रशियन डायरेक्टर्स इन्व्हेस्टमेंट फंड (RDIF) ने गेल्या वर्षी डॉ. रेड्डी लॅबोरेटरीजसोबत भारतात स्पुटनिक- V च्या तिसऱ्या टप्प्याच्या चाचणीसाठी करार केला होता. एप्रिलमध्ये, स्पुतनिक- V ला भारतात इमर्जन्सी वापराची परवानगी देण्यात आली. 14 मे रोजी डॉ. रेड्डी यांनी हैदराबादमध्ये मर्यादित स्वरुपात पहिली लस दिली होती.


भारतात रशियाची लस स्पुटनिक-व्हीची किंमत निश्चित केली गेली आहे. याची किंमत 948 रुपये असेल यावर पाच टक्के जीएसटी लागल्यानंतर त्याच्या एका डोसची किंमत 995 रुपये असेल. रशियन लस स्पुटनिक-व्हीची पहिली खेप 1 मे रोजी भारतात आली. कोरोनाव्हायरसच्या संसर्गाविरूद्ध रशियन  Sputnik V लस वापरण्यास अधिकृत  मान्यता देणारा भारत जगातील 60 वा देश ठरला आहे. जगातील एकूण लोकसंख्येच्या, काही अब्ज किंवा 40 टक्के लोकसंख्या असलेल्या देशांमध्ये या लसीच्या वापरास मंजुरी मिळाली आहे. 


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha




संबंधित बातम्या :