Honey And Rose Water Face Pack : हिवाळ्यामध्ये (Winter Season) त्वचेची विशेष काळजी घ्यावी लागते. थंडीत त्वचा कोरडी पडते.  थंडीमध्ये जर तुम्ही केमिकल्स असणाऱ्या प्रोडक्टचा वापर केला तर तुम्हाला रॅश येणे (Skin Rashes) आणि त्वचा कोरडी पडणे या समस्या जाणवू शकतात.  त्यामुळे जर तुम्हाला स्किनला मुलायम ठेवायचे असेल तर मध (Honey) आणि गुलाब पाण्याचा (Rose Water) हा फेस पॅक चेहऱ्याला लावा. या फेस पॅकमुळे त्वचा  हायड्रेड राहते. तसेच त्वचेचा ड्रायनेस देखील निघून जातो. जाणून घेऊयात मध आणि गुलाब पाण्याचा फेस पॅक तयार करण्याची सोपी पद्धत-


-मध आणि गुलाब पाण्याचा फेस पॅक तयार करण्यासाठी 1 चमचा मध आणि 1 चमचा गुलाब पाणी एका वाटीत मिक्स करून घ्या. 
-हे तयार करण्यात आलेले मिश्रण चेहऱ्यावर आणि मानेवर लावा. 
-20 मिनीट हा पॅक चेहऱ्यावर ठेवा. 
-त्यानंतर कोमट पाण्याने चेहरा धुवून घ्या. 
-हा पॅक आठवड्यातून दोन वेळा चेहऱ्यावर लावा.
मध आणि गुलाब पाण्याच्या या पॅकमुळे त्वचा मुलायम होते तसेच चेहऱ्यावरील डेड स्किन निघून जाते.   


थंडीमध्ये अल्कोहोल बेस्ड टोनर (Alcohol Based Toner) चा वापर केल्याने स्किनवर रॅश येतात. त्याच्या ऐवजी गुलाब पाणी आणि  ग्लिसरीन युक्त टोनरचा वापर करावा. तसेच चंदन पावडरमध्ये गुलाब पाणी मिक्स करून चेहऱ्याला लावावे. थंडीमध्ये स्किनमधील नॅचरल ऑयल (Natural Oils) कमी होते. त्यामुळे त्वचा कोरडी पडते. साबणाने त्वचेतील नॅचरल ऑइल संपते. त्यामुळे अंघोळ करताना साबणाचा वापर कमी करावा.


Kitchen Hacks : हिवाळ्यात फ्रीजमध्ये अशा स्टोअर करा पालेभाज्या; भाज्या राहतील ताज्या! 
 टीप : वरील सर्व उपाय घरगुती असून ABP माझा यातून कोणताही दावा करत नाही. त्यामुळे सदर उपायाचा तज्ज्ञांच्या सल्ल्याने वापर करणे फायदेशीर ठरते. 


Winter Health Care: थंडीत 'या' 5 गोष्टींचा आहारात समावेश करणं ठरेल फायदेशीर; जाणून घ्या फायदे