Weight Loss : अनेकांना वाढलेल्या वजनामुळे वेगवेगळ्या समस्यांचा सामना करावा लागतो. काही लोक वजन कमी (Weight Loss) करण्यासाठी डायटिंग कतरतात तर काही लोक जिममध्ये जाऊन व्यायाम करतात. जर तुम्हाला डाएटिंग किंवा जिममध्ये जाऊन एक्सरसाइज करणं शक्य नसेल तर घरच्या घरी तुम्ही हे दोन एक्सरसाइज करू शकता.  


वजन कमी करण्यासाठी तुम्ही पुश-अप आणि स्क्वाट्स हे व्यायामाचे प्रकार घरच्या घरी करू शकता. जाणून घेऊयात या एक्सरसाइजबद्दल-
1.पुश-अप केल्यानं शरीराच्या वरच्या भागातील मसल्स टोन होतात. तसेच वजन देखील कमी होते.  
2.स्क्वाट्स केल्यानं तनाव कमी होते. तसेच लोअर बॉडी पार्ट्स मजबूत होतात.  


कधी करावा हा एक्सरसाइज-
सकाळी उठल्यानंतर हे दोन व्यायमीचे प्रकार तुम्ही करू शकता. कमीत कमी 40 पुश-अप आणि स्क्वाट्सचे 20 चे तीन सेट केल्यानं तुमचे वजन झटपट कमी होईल. हळू हळू स्क्वाट्स आणि पुश-अपची संख्या तुम्ही वाढवू शकता. 


व्यायाम केल्यानंतर योग्य प्रमाणात प्रोटिन ड्रिंग्स प्यावेत. शरीरातील कॅलरीज बर्न करण्यासाठी तसेच बॉडी फॅट कमी करण्यासाठी रोज 30 ते 40 मिनीट  हा व्यायाम केला पाहिजे.


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.


महत्वाच्या बातम्या : 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha