Weight Loss : वजन कमी करण्यासाठी लोक वेगवेगळे डाएट प्लॅन फॉलो करतात.  चपाती सोडून भाताचा समावेश अनेक लोक वेट लॉस डाएटमध्ये करतात.  ब्राऊन आणि रेड राइस हे भाताचे दोन प्रकार आहेत जे  व्हाइट राइस ऐवजी तुम्ही खाऊ शकता.  पण काही लोकांना प्रश्न पडला असेल की,  वजन कमी करण्यासाठी कोणत्या राइसचा समावेश डाएटमध्ये करणं आरोग्यासाठी चांगलं ठरेल? जाणून घेऊयात रेड (red rice) आणि ब्राऊन राइस (Brown rice)बाबत...


ब्राऊन राइसमध्ये जर्म आणि ब्रेन हे घटक असतात. त्यामुळे जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर व्हाइट राइसऐवजी तुम्ही ब्राऊन राइसचा समावेश डाएटमध्ये करू शकता.  हा तांदूळ आरोग्यासाठी चांगला आहे.  ब्राऊन राइसमध्ये असणाऱ्या रंगद्रव्यांमुळे (pigments) या तांदळाला तपकिरी रंग असतो. जर तांदळामधील रंगद्रव्यांचे प्रमाण वाढले तर या तांदळाचा रंग लाल, काळ किंवा जांभरा होतो. त्यामुळे रेड राइस हा बाऊन राइसचा एक प्रकार आहे, असं म्हणता येईल. 


जर तुम्हाला वेट लॉस डाएटसाठी ब्राऊन किंवा रेड राइसमधील एकाची निवड करत असाल तर तुम्ही दोन्ही राइसमधील कोणत्याही राइसचा समावेश डाएटमध्ये करू शकता. कारण या दोन्ही राइजमध्ये कर्बोहायड्रेट्स आणि प्रोटिन्सचे प्रमाण सारखेच असते. दोन्ही राइसच्या प्रकारांमध्ये फायबरचे प्रमाण देखील बऱ्यापैकी समान आहे. पण या राइसचा समावेश डाएटमध्ये योग्य प्रमाणात करावा. कारण जर तुम्ही जास्त प्रमाणात रेड किंवा ब्राऊन राइस खाल्ला तर तुमच्या शरीरातील कर्बोहायड्रेट्सचे प्रमाण वाढेल. ज्यामुळे वजन वाढते. 


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.


संबंधित बातम्या