मुंबई : प्रेमात पडायला कुणाला नकोय? प्रत्येकाला किंवा प्रत्येकीलाच वाटतं की आपणही रिलेशनशीपमध्ये असावं, आपल्यालाही एक बॉयफ्रेन्ड वा गर्लफ्रेन्ड असावी. पण सगळ्याच क्षेत्रात वाढलेली स्पर्धा ही प्रेमाच्या क्षेत्रातही जरा जास्तच वाढलेली दिसून येते. त्यामुळे सध्याच्या घडीला रिलेशनशीपमध्ये असणं ही काही सोपी गोष्ट नाही. मुलांच्यासाठी तर ही गोष्ट अतिशय अवघड होत चालली असून एखाद्या मुलीचे मन जिंकण्यासाठी काय काय गोष्टी कराव्या लागतात हे ज्याचं त्यालाच माहिती आहे. अनेकदा मुलींचं किंवा आपल्या क्रशचं मन कसं जिंकावं हे मुलांना समजत नाही.
आपण सिंगल असण्यामागे कदाचित आपल्या काही सवयी कारणीभूत असण्याची शक्यता आहे. या सवयींमुळे आपली क्रश आणि इतर कोणतीच मुलगी आपल्याकडे आकर्षित होत नसेल. मुलींना मुलांच्या काही सवयी आवडत नाहीत. म्हणून अशा काही सवयींपासून मुलांनी दूर राहणं अत्यावश्यक ठरतं. त्या सवयी कोणत्या आहेत ते पाहू.
दारू आणि सिगारेटचे व्यसनअलिकडच्या काळात मुलं ही मोठ्या प्रमाणावर व्यसनांच्या आहारी जाताना दिसतात. सिगारेटचे व्यसन आणि दारू या गोष्टी अनेकांमध्ये नॉर्मल होत आहेत. पण बहुतांश मुलींना या गोष्टींचा तिटकारा वाटतोय. व्यसनी मुलांपासून मुली या शक्यतो दूरच राहणं पसंत करतात. जर ही सवय तुम्हाला असेल तर आजच ती सोडा.
भांडखोर, चिडखोरअनेक मुलांना नको तिथे आपली हिरोगिरी दाखवायची सवय असते. मग त्यातून ते सातत्याने भांडणं काढतात, मारामाऱ्या करतात, जाता-येता शिव्या कुणालाही शिव्या देतात, दादागिरी करतात. समाजाला उपद्रवकारक ठरणाऱ्या गोष्टींमध्ये जास्तीत जास्त सहभागी होतात. पण कोणत्याही सभ्य मुलीला ही गोष्ट आवडत नाही. त्यामुळे आपण जर भांडखोर आणि चिडखोर असाल तर ही सवय आजच बंद करा. अन्यथा आपण सिंगल राहण्याची शक्यता आहे.
शिव्या देणारे, अपमानजनक बोलणारेजी मुलं सातत्याने अपशब्द वापरतात, शिव्या देतात, काहीही घाणेरडं बोलत राहतात अशा मुलांपासून मुली या दूरच राहणं पसंत करतात. एखाद्याच्या वयाचा विचार न करता जर कोणी त्याला अपमानजनक बोलत असेल किंवी आक्षेपार्ह भाषा वापरत असेल तर अशा मुलांपासून मुली दूर राहतात. जर मुलींचेमन जिंकायचं असेल तर सभ्य भाषेचा वापर करणं आवश्यक आहे.
खोटारड्या मुलांपासून मुली दूर राहतातआपल्यासोबत खोटं बोलणं हे कुणाही मुलीला किंवा महिलेला आवडत नाही. मग मुलगा खोटं बोलतोय म्हणून मुली रिलेशनशीप संपवण्यास मागे पुढे बघत नाहीत. तुम्ही कुठे आहात किंवा कोणासोबत आहात याबद्दल जर तुम्ही मुलींना खोटं सांगितलं तर मग सगळं संपलंच. तसेच तुम्ही कोणता जॉब करता, तुमच्या कुटुंबाची पार्श्वभू्मी काय आहे तसेच तुमचा भूतकाळ कसा आहे या गोष्टींची सत्य माहिती मुलींना अपेक्षित असते. या गोष्टींबद्दल जर तुम्ही खोटं बोलला तर तुमचे रिलेशनशीप कधीही संपू शकते हे नक्की.
मग या आणि अशा अनेक वाईट सवयी जर तुम्हालाही असतील तर मग आजच त्या बंद करा. नाहीतर रिलेशनशीपची स्वप्न बघणाऱ्या तुम्हाला 'फॉरएव्हर सिंगल' रहावं लागेल हे नक्की.
संबंधित बातम्या :