India Coronavirus Updates : कोरोनाबाधितांच्या दैनंदिन रुग्णसंख्येत चढ-उतार सुरुच आहे. देशात चार दिवसांनी पुन्हा एकदा दैनंदिन कोरोना रुग्णांच्या संख्येत काहीशी वाढ झाल्याचं दिसून आल. गुरुवारी आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत 30,570 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर 431 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 38,303 रुग्ण उपचारानंतर कोरोनामुक्त झाले आहेत.
कोरोनाबाधितांची गेल्या दहा दिवसांतील आकडा :
10 सप्टेंबर : 33,376
11 सप्टेंबर : 28,591
12 सप्टेंबर : 27,254
13 सप्टेंबर : 25,404
14 सप्टेंबर : 27,176
15 सप्टेंबर : 30,570
भारतातील कोरोनाची स्थिती
कोरोना महामारीच्या सुरुवातीपासून आतापर्यंत एकूण तीन कोटी 33 लाख 47 हजार रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यापैकी 4 लाख 43 हजार 928 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, आतापर्यंत 3 कोटी 25 लाख 60 हजार रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. देशात कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या चार लाखांहून कमी आहे. तर एकूण 3 लाख 42 हजार 923 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
कोरोनाची एकूण आकडेवारी :
कोरोना रुग्णांची एकूण संख्या : तीन कोटी 33 लाख 47 हजार 325
एकूण कोरोनामुक्त रुग्ण : तीन कोटी 25 लाख 60 हजार 474
सक्रिय रुग्णांची एकूण संख्या : तीन लाख 42 हजार 923
एकूण मृत्यू : चार लाख 43 हजार 928
एकूण लसीकरण : 76 कोटी 57 लाख 17 हजार लसीचे डोस
राज्यात काल (बुधवारी) 3783 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, तर 4364 रुग्ण कोरोनामुक्त
राज्यात काल (बुधवारी) 3,783 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 4 हजार 364 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 63 लाख 17 हजार 070 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.07 टक्के आहे.
राज्यात काल (बुधवारी) 56 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यूदर 2.12 टक्के झाला आहे. राज्यात सध्या 49 हजार 034 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. पुणे जिल्ह्यात सध्या सर्वात जास्त 13,258 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील एकूण 16 जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 100 च्या खाली आहे. जळगाव (11), नंदूरबार (2), धुळे (1), जालना (40), परभणी (55), हिंगोली (18), नांदेड (24), अकोला (30), वाशिम (01), यवतमाळ (04), वर्धा (3), भंडारा (2), गोंदिया (2), चंद्रपूर (52), गडचिरोली (12 ) या 16 जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 100 च्या खाली आहे.
राज्यातील 46 महानगरपालिक क्षेत्र आणि जिल्ह्यांमध्ये आज एकही कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली नाही. धुळे, अमरावती, यवतमाळ, वाशिम, वर्धा, गोंदिया, चंद्रपूर या सात जिल्ह्यात एकाही कोरोनाबाधित रुग्णाची नोंद झालेली नाही.
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 5,63,61,089 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 65,07,930 (11.55 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 2,87,356 व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर 1,926 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.