Beauty Tips : अनेकवेळा योग्य लक्ष न दिल्यास ओठांचा रंग फिकट किंवा काळा होऊ लागतो. यासाठी तुम्ही सर्व प्रकारचे उपाय देखील करून पाहता, पण तुम्हाला अपेक्षित परिणाम मिळत नाही. आपले ओठ आकर्षक असावं असं प्रत्येकालाच वाटत असतं. पण अनेकदा ओठ काळे पडण्याची समस्या अनेकाना भेडसावते. त्यामुळे ओठांची काळजी घेणं महत्त्वाचं आहे. आज आम्ही तुम्हाला अशाच घरगुती उपायांबद्दल सांगणार आहोत. यामुळे तुमच्या ओठांचा गुलाबीपणा परत येईल.


गुलाबी ओठांसाठी तिळाच्या तेलात मिसळा ‘या’ गोष्टी



  1. खोबरेल तेल


नारळ आणि तिळाचे तेल ओठांचा काळेपणा दूर करण्यात मदत करते. यासाठी अर्धा चमचा खोबरेल तेल आणि अर्धा चमचा तिळाचे तेल घ्या. आता हे दोन्ही चांगले मिसळा. याने ओठांना पाच मिनिटे मसाज करा. 30 मिनिटे असेच राहू द्या. नंतर धुवून टाका. हळुहळू ओठांचा काळेपणा निघून जाईल.



  1. साखर


साखरेसोबत तिळाचे तेल वापरा. एक छोटा चमचा साखर घ्या आणि त्याचा हलका चुरा करा. आता अर्धा चमचा तिळाचे तेल घेऊन, त्यात साखर मिसळून स्क्रब बनवा. आता ते ओठांवर लावा आणि बोटांच्या मदतीने सुमारे तीन ते चार मिनिटे स्क्रब करा. त्यानंतर साध्या पाण्याने ओठ धुवा.



  1. हळद


ओठांचा काळेपणा दूर करण्यासाठी हळद आणि तिळाचे तेलही वापरता येते. यासाठी अर्धा चमचा तिळाचे तेल घ्या आणि त्यात दोन चिमूटभर हळद मिसळा. ही पेस्ट ओठांवर लावा आणि दोन मिनिटे मसाज करा. अर्धा तास तसंच राहू द्या, मग स्वच्छ पाण्याने धुवा.


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha