Walking For Weight Loss : चालणं (Walking) आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. यामुळे शरीराला अनेक प्रकारे फायदे तर मिळतातच, शिवाय अनेक आजारांचा धोकाही कमी होतो. एकूणच आरोग्यासाठी चालणं फायदेशीर आहे. एका रिपोर्टनुसार, जे लोक दररोज 8 ते 10 हजार पावले चालतात त्यांचे वजन नियंत्रणात (Weight Loss Tips) राहण्यास मदत होते. तसेच, कोलेस्ट्रॉल, रक्तदाब आणि रक्तातील साखरेसारख्या गंभीर समस्यांवर नियंत्रण ठेवण्यास मदत होऊ शकते. चालणे हृदयाच्या आरोग्यासाठीही फायदेशीर मानले जाते. यामुळे स्नायू आणि सांधे मजबूत होतातच. पण तुमचा तणाव आणि चिंताही कमी होते. तसेच, शरीर नेहमी सक्रिय राहते. अशा परिस्थितीत वजन कमी करण्यासाठी दिवसातून कोणत्या वेळी चालणं योग्य या संदर्भात आम्ही तुम्हाला काही खास टिप्स सांगणार आहोत. 


वजन कमी करण्यासाठी कधी चालावे?


ओबेसिटी जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासानुसार वजन कमी करण्यासाठी चालण्यापेक्षा कोणताही साधा आणि सोपा व्यायाम असू शकत नाही. जर वजन वाढले असेल आणि तुम्हाला कॅलरी बर्न करून ते कमी करायचे असेल तर रोज सकाळी 7 ते 9 ही वेळ सर्वोत्तम मानली जाते. जर तुम्हाला सकाळी चालता येत नसेल तर संध्याकाळी आणि रात्री चालण्यानेही तुम्ही वजन कमी करू शकता.


रोज चालल्यानंतरही वजन का कमी होत नाही?


वजन नियंत्रणात ठेवायचे असेल तर कॅलरीजचे सेवन कमी करावे. जर दररोज 8-10 हजार पावले चालून किंवा 1 तास चालल्यानंतरही वजनात फरक पडत नसेल तर याचा अर्थ तुमच्या शरीरात खूप कॅलरीज आहेत. अशा परिस्थितीत फक्त व्यायाम किंवा चालण्याने फायदा होणार नाही, यासाठी तुम्हाला खालील गोष्टींवर नियंत्रण ठेवावे लागेल.


वजन कमी करण्यासाठी चालण्याव्यतिरिक्त काय करावे?


1. दररोज 200 ते 300 पेक्षा कमी कॅलरीज वापरा.
2. तुमच्या आहारात पोषक तत्वांनी युक्त अन्नपदार्थांचा समावेश करा.
3. तुमच्या आहारात प्रथिने, कर्बोदके आणि सूक्ष्म पोषक घटकांचा जास्तीत जास्त समावेश करा.
4. रोज रात्री 7 ते 8 तासांची पुरेपूर झोप घ्या.
5. साखर, गोड पदार्थ, चिप्स, कोल्ड्रिंक्स, जंक फूड या पदार्थांपासून दूर राहा. 


महत्त्वाच्या बातम्या :


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. 


Pregnancy Health Issues : गरोदरपणात महिलांना 'या' आजारांचा सर्वाधिक धोका; अशी आरोग्याची काळजी घ्या