Viral : पती-पत्नीचे (Husband - Wife Relation) नाते हे एखाद्या रेशीम धाग्यासारखे असते. हे नाते विश्वास आणि प्रेमाने आणखी बहरते. पण एकदा का या नात्याच्या विश्वासाला तडा गेला की मग होत्याचं नव्हतं होऊन बसतं, नात्याचा धागा जेव्हा तुटण्याच्या मार्गावर असतो, तेव्हा जोडीदाराच्या असंख्य गोष्टी नकोशा वाटत असतात. असंच एक प्रकरण कर्नाटक हायकोर्टातून समोर आलंय. पती-पत्नीशी संबंधित मनोरंजक प्रकरणे सातत्याने समोर येत आहेत. येथे, पत्नीला जंक फूड खाण्यापासून रोखणे पतीला इतके महागात पडले की पती थेट तुरुंगात गेला. आता या प्रकरणात हस्तक्षेप करत कर्नाटक उच्च न्यायालयाने (Karnataka High Court) पतीला जामीन मंजूर केला आहे.


 


पती जंक फूड खाऊ देत नाही, पत्नीची हायकोर्टात धाव


कर्नाटक उच्च न्यायालयात एक विचित्र प्रकरण समोर आले आहे. पत्नीने पतीविरुद्ध आयपीसी कलम 498 अ अंतर्गत एफआयआर दाखल केला होता. या विरोधात पतीने उच्च न्यायालयातील न्यायमूर्तींसमोर युक्तीवाद करताना सांगितले की, मी तिला फ्रेंच फ्राई खाण्यापासून रोखल्यामुळे, पत्नीने माझ्याविरुद्ध क्रुरतेचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाची दखल घेत न्यायमूर्ती एम नागप्रसन्ना यांनी पतीविरुद्ध सुरू असलेल्या क्रूरतेच्या खटल्याला अंतरिम स्थगिती दिली आहे.


 


न्यायाधीशही संतापले...


यासंदर्भात कर्नाटक उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी सांगितले की, पतीविरुद्ध तक्रारीत केलेले दावे पूर्णपणे फोल आहेत. त्यामुळे या प्रकरणातील त्याच्याविरुद्धच्या तपासाला स्थगिती देण्यात आली आहे. “पतीविरुद्ध कोणत्याही चौकशीला परवानगी देणे कायद्याच्या प्रक्रियेचा दुरुपयोग होईल आणि पत्नीच्या आरोपाला विश्वास देईल की तिला निर्धारित वेळी फ्रेंच फ्राईस खाण्याची परवानगी नाही. त्यामुळे पतीविरोधातील सर्व तपास थांबवण्याचा अंतरिम आदेश देण्यात यावा.” उच्च न्यायालयानेही पतीला कामासाठी अमेरिकेला जाण्याची परवानगी दिली आहे.


 


फ्रेंच फ्राईज, भात आणि नॉनव्हेज खाणे बंद केले...


पत्नीने तक्रारीत दावा केला होता की, “मुलाच्या जन्मानंतर तिच्या पतीने तिला फ्रेंच फ्राईज, भात आणि नॉनव्हेज खाण्यास मनाई केली होती.” दुसरीकडे, पतीने असा युक्तिवाद केला की मुलाच्या जन्मापूर्वी सहा वर्षे अमेरिकेत राहून पत्नीने त्याला घरातील सर्व कामे करायला लावली. नवरा म्हणाला, " ती तिचा रिकामा वेळ नाटकं बघण्यात घालवत असे."


 


पतीवर जारी केलेले परिपत्रक...


पतीने आपल्याविरुद्धची तक्रार निरर्थक असल्याचा आरोप केला आणि तपासाला स्थगिती देण्याची मागणी केली. वकील शांती भूषण यांनी तरुणाच्या वतीने युक्तिवाद करताना न्यायालयात सांगितले की, पत्नीने पती आणि सासरच्या लोकांच्या विरुद्ध आयपीसी कलम 498 अ अंतर्गत तक्रार दाखल केली आहे. न्यायालयाने यापूर्वी पालकांविरुद्धच्या तपासाला स्थगिती दिली होती. असा युक्तिवाद करण्यात आला की त्याचा आशिल अमेरिकेत काम करत होता, परंतु तो परत जाऊ शकला नाही, कारण त्याच्या पत्नीच्या तक्रारीनंतर खालच्या कोर्टाने त्याच्याविरुद्ध लुक आउट सर्कुलर (LOC) जारी केले होते.


 



न्यायमूर्ती म्हणतात, कायदेशीर प्रक्रियेचा पूर्णपणे दुरुपयोग


न्यायमूर्ती नागप्रसन्ना म्हणाले की, हा कायद्याच्या प्रक्रियेचा स्पष्ट दुरुपयोग आहे आणि या प्रकरणात एलओसीचा वापर “शस्त्र म्हणून” केला जात आहे. न्यायालयाने म्हटले की, संपूर्ण तक्रार निराधार असल्याचे दिसून येत असून त्या व्यक्तीला कामासाठी अमेरिकेला जाण्याची परवानगी देण्याकडे त्यांचा कल आहे. कोर्ट म्हणाले, “पतीवर गुन्हा काय? तो रडत म्हणतो की ‘तिने मला बाथरुम साफ करायला सांगितली, टीव्ही बघत असताना भांडी धुवायला सांगितली आणि त्याबदल्यात माझ्यावर कलम 498 अ चा आरोप आहे.’ हा कायद्याचा सरळ सरळ दुरुपयोग आहे. 


 


हेही वाचा>>>


Relationship Tips : सासरच्या गोष्टी गुपचूप माहेरी सांगाल, तर स्वत:च अडकाल जाळ्यात! 'या' समस्यांना विनाकारण देतायत आमंत्रण


 


(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )