Viral: गेल्या काही दिवसात अवघ्या देशभरात छठपूजा निमित्त भक्तिमय वातावरण दिसून आले. हा सण आता जरी संपला असला तरी लोकांमध्ये त्याचा उत्साह कायम आहे. सोशल मीडियावर एका महिलेचा छठपूजेदरम्यानचा व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये या महिलेची हिंमत पाहून लोक आश्चर्यचकित झालेत. सोबत तिचं भरभरून कौतुकही करत आहेत. व्हिडिओ पाहिल्यानंतर लोकांनी महिलेच्या शौर्याचे कौतुक केले आहे. या व्हायरल व्हिडीओबद्दल जाणून घेऊया.


छठपूजेच्या वेळी महिलेचा विषारी सापाशी सामना...


सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, छठपूजेच्या वेळेस एक महिला पाण्यात प्रार्थना करत असते, तिच्या बाजूला इतरही महिला आहेत. अशात पोहत पोहत एक साप प्रार्थना करत असलेल्या महिलेच्या जवळ येतो. हा साप बँडेड क्रेट जातीचा असल्याचे सांगण्यात आहे, जो अत्यंत विषारी आहे. हा साप पाहून आजूबाजूचे लोक मोठ्याने ओरडत होते. मात्र, या महिलेने अत्यंत शांतपणे परिस्थिती हाताळली. ज्याचं सर्वत्र कौतुक होतंय. हा साप पाहून आजूबाजूचे लोक जोरात ओरडत होते. मात्र या महिलेने अत्यंत शांततेने या सापाच्या मार्गात न येता उलट त्याला त्याचा रस्ता दाखवून दिला. हा व्हिडीओ संजय त्रिपाठी यांच्या प्रोफाइलवर शेअर करण्यात आला आहे. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये असे लिहिले आहे की, 'छठ पूजेचा हा व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये नदीत पूजा करणारी महिला साप येताना पाहून घाबरली नाही, तर तिने सापाला तिच्या जवळून जाण्यासाठी रस्ता दिला. येथे आम्ही व्हिडिओ शेअर करत आहोत.


नेटकऱ्यांच्या मजेशीर कमेंट्स..


यासोबतच लोकांनी या पोस्टवर खूप मजेशीर कमेंट्सही केल्या आहेत. एका यूजरने कमेंट केली की, 'ती एक निडर महिला होती हे खरे आहे. आणि मग ती छठ मैयाची पूजा करत होती, सर्व आईची कृपा आहे. जय छठ मैया म्हणा. आणखी एका युजरने लिहिले आहे की, हा साप अत्यंत धोकादायक आहे, हा एक बँडेड क्रेट आहे… मात्र, येथे ही महिला आणि साप अशा दोघांनीही संयम राखला आहे. सापही नियंत्रण न गमावता शांतपणे आपल्या वाटेला निघून गेला आणि त्या महिलेनेही तिथे उभी राहून सापाला जाऊ दिले. त्यांच्यापैकी एकाचेही नियंत्रण सुटले असते तर काहीही होऊ शकले असते.






बँडेड क्रेट किती धोकादायक आहे?


बँडेड क्रेट, ज्याला अहिराज साप असेही म्हणतात, हा एक विषारी साप आहे. जगातील सर्वात विषारी सापांमध्ये याची गणना केली जाते. या सापाच्या विषाचा उपयोग औषधनिर्मिती आणि वैद्यकीय क्षेत्रात केला जातो. हे साप भारतात आढळतात आणि बहुतेक रात्री बाहेर येतात. हे साप तुम्ही शेतात, जंगलात आणि घराच्या बागांमध्ये पाहू शकता. त्यांच्या अंगावर जाड पिवळे आणि काळे पट्टे असतात. या सापाच्या चाव्याव्दारे डास चावण्याइतकाच त्रास होतो, परंतु काही वेळाने पोटात जळजळ होणे, डोळ्यात जळजळ होणे आणि उपचारास उशीर होणे अशी लक्षणे दिसू लागतात. त्याच्या शरीरावर पिवळे किंवा दुधाचे आणि काळे पट्टे असतात.


हेही वाचा>>>


Viral: 'सण प्रत्येकासाठी सारखेच नसतात!' दिवाळीत डिलिव्हरी बॉयने तब्बल 6 तास काम केलं, पण कमाई पाहाल तर डोळे भरून येतील


(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )