Viral: अनेक स्वप्न उराशी बाळगून लोक कंपनीत नोकरीसाठी जॉईन होतात. मग वाढत्या अनुभवासोबतच जसा जसा पगार वाढेल, तस तशी आपली स्वप्न देखील पूर्ण होतील असं कोणत्याही कर्मचाऱ्याला वाटणं अगदी स्वाभाविक आहे. त्यासाठी तो मेहनतही करतो. पण इतकं करूनही जर कोणतीही कंपनी त्याला अचानक बाहेरचा रस्ता दाखवत असेल तर कर्मचाऱ्यासाठी अतिशय वाईट प्रसंग असेल. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म Reddit वर एक पोस्ट शेअर करण्यात आली होती, ज्यामध्ये एका अमेरिकन कंपनीच्या कर्मचाऱ्याने कंपनीतून अचानक काढून टाकल्याबद्दल संताप व्यक्त केला आहे. 


25% बोनस आणि पगारवाढ देऊन बाहेरचा रस्ता दाखवला...


अमेरिकेतील एका कंपनीच्या कर्मचाऱ्याने यांनी पोस्टमध्ये सांगितले की, त्यांना कंपनीकडून सकारात्मक प्रतिक्रिया, 25% बोनससह पगारवाढ देण्यात आली. काही महिन्यांनंतर त्यांना अचानक नोकरीवरून काढून टाकण्यात आले. या कर्मचाऱ्याने रेडिटच्या माध्यमातून आपला संताप व्यक्त केला आहे. आपल्या Reddit पोस्टमध्ये त्याने म्हटले आहे की, या निर्णयामुळे त्यांना खूप संताप होत आहे. या व्हायरल पोस्टवर लोकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. जाणून घ्या..


ऑनलाइन दुःख व्यक्त


नुकत्याच काढून टाकलेल्या कर्मचाऱ्याने ऑनलाइन आपले दुःख व्यक्त केले. जवळपास दीड वर्षे कंपनीत काम केल्यानंतर नोकरीवरून काढून टाकण्यात आल्याने त्याला अत्यंत मनस्ताप होतोय. ही पोस्ट r/jobs वर शेअर करण्यात आली होती.




पोस्टमध्ये नेमकं काय म्हटलंय?


पोस्टमध्ये युजरने लिहिले की, ''गेल्या बुधवारी मला नोकरीवरून काढून टाकण्यात आले. मी या कंपनीत 1.5 वर्षे VP म्हणून काम करत होतो आणि मला एकदाही नकारात्मक प्रतिक्रिया मिळाली नाही. पण अचानक मार्चमध्ये माझ्या रिव्ह्यू दरम्यान मला खूप चांगली पगारवाढ आणि अतिरिक्त 25% बोनस मिळाला. पोस्टमध्ये पुढे म्हटलंय की, कंपनीतून काढून टाकण्याच्या एक आठवडा आधी कंपनीचे सीईओ आणि सीओओ यांनी संबंधित कर्मचाऱ्याशी संपर्क साधला आणि त्याला कळवले की, हा निर्णय वैयक्तिक नसून त्याचे पद काढून टाकले जात आहे. त्यांनी त्याला 10 आठवड्यांचा पगार देत असल्याचे सांगितले. 


दुसऱ्याला कामावर घेतले


या निर्णयामुळे तो निराश झाला, कारण कपातीसाठी त्याचे पद काढून टाकले जात होते, पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे, काही दिवसांनंतर कंपनीच्या LinkedIn वर एक नवीन पोस्ट दिसली, ज्यामध्ये त्याच पदासाठी नवीन व्यक्तीची नियुक्ती करण्यात आल्याचे उघड झाले. संबंधित कर्मचाऱ्याने सांगितले की, 'आज मी लिंक्डइनवर गेलो आणि पाहिले की त्यांनी माझ्या त्याच पोस्टवर दुसऱ्याला काम दिले आहे आणि माझे हृदय तुटले. मी कधीही एकही कामात फसवणूक केली नाही, मी विश्वासार्ह होतो, मला जे काही सांगितले गेले ते मी केले. मी माझे सर्व पीटीओ घेतले नाही, आठवड्याच्या शेवटी काम केले आणि कधीही उपलब्ध असे. ते पुढे म्हणाले की त्यांना कधीही नकारात्मक प्रतिक्रिया मिळाली नव्हती. तरी देखील असे का केले? असा प्रश्न कर्मचाऱ्याने विचारला


पोस्टवर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया


या पोस्टवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत. जिथे काही लोक म्हणाले की या कर्मचाऱ्याच्या जागी त्यांना त्यांच्यापेक्षा जास्त आवडलेल्या एखाद्याला बसवायचं असू शकतं. तर काही यूजर्सनी सांगितले की, त्यांना कदाचित कमी पगार असलेले कोणीतरी सापडले असेल आणि त्यांना फक्त पैसे वाचवायचे असतील. एका यूजर म्हटले की, कदाचित हे तुमच्याबद्दल नाही आणि त्यांना कमी पगारात तुमचे काम करण्यासाठी एखाद्याला नियुक्त करायचे आहे. मी ज्या कंपनीत काम केले त्या कंपनीत त्यांनी एका अकाउंटंटला काढून टाकले आणि एका नवीन कॉलेज ग्रॅज्युएटला अर्ध्या पगारावर पुन्हा नियुक्त केले.


 


हेही वाचा>>>


Viral: कर्मचाऱ्याचा झाला अपघात, बॉसने सोडली माणुसकी! 'असा' मेसेज पाठवला की भडकले नेटकरी, संभाषणाचा स्क्रीनशॉट व्हायरल


(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )