vinayak chaturthi 2021 गणपती हे अनेकांचं अराध्य दैवत. सकल कलागुणांचा अधिपती गणपतीचं दुसरं नाव म्हणजे विनायक. पौराणिक कथांमध्ये असणाऱ्या मान्यतांनुसार चतुर्थीच्या दिवशी गणपतीची पूजाअर्चा केल्यानं घरात सुखशांती नांदते. दर महिन्यात दोन चतुर्थी येतात. पहिली शुक्ल पक्षात आणि दुसरी कृष्ण पक्षात. शुक्ल पक्षात आलेल्या चतुर्थीला विनायक चतुर्थी म्हणतात, तर कृष्ण पक्षात येणाऱी चतुर्थी ही संकष्टी चतुर्थी म्हणून ओळखली जाते. या महिन्यात 17 मार्चला म्हणजेच बुधवारी विनायकी चतुर्थी आहे. 


तिथी आणि पूजेचं महत्त्वं 


फाल्गुन महिन्यातील शुक्ल चतुर्थी तिथी 16 मार्चला 8 वाजून 58 मिनिटांनी सुरु होऊन 17 मार्चला 11 वाजून 28 मिनिटांनी संपणार आहे. हिंदू पंचांगानुसार विनायक चतुर्थीला गणपतीची पूजा दुपारच्या वेळी केली जाते. पूजेचा मुहूर्त 17 मार्च 2021ला सकाळी 11 वाजून 17 मिनिटांनी सुरु होऊन दुपारी 1 वाजून 42 मिनिटांपर्यंत असणार आहे. त्यामुळं एकूण पूजेसाठी 2 तासांचा अवधी असणार आहे. 


पूजेला लाभ 


विनायक चतुर्थीच्या दिवशी गणपतीची पूजा केल्यास जीवनातील सर्व अडचणी दूर होण्यास मदत होईल, कोणी गंभीर आजारानं त्रासल्यास अशा व्यक्तींनाही आराम मिळणार आहे. विद्यार्थ्यांनाही या पूजेमुळं फायदा होणार आहे. गणपतीच्या आराधनेनं विनायकी चतुर्थीला भक्तांना लाभच होणार आहे. 


उपवास करतेवेळी काय काळजी घ्याल? 


विनायक चतुर्थीच्या दिवशी उपवास करतेवेळी विशेष काळजी घेतली जाणंही तितकंच महत्त्वं आहे. हा उपवास पूर्ण भक्तीभावनेनेच करणं अपेक्षित आहे. गणेशमंत्र आणि गणपतीच्या आरतीचं उच्चारण या दिवशी करावं. कोणत्याही प्रकारच्या वाईट कृत्यांपासून दूर राहा आणि संताप करु नका. वाणी मधूर ठेवून विद्यार्थ्यांनीही आई- वडिलांचा आशीर्वाद घ्यावा.