Bread Chaat Recipe: हिवाळ्यात प्रत्येकालाच काहीतरी मसालेदार आणि खमंग खाण्याची इच्छा होते. थंडीच्या मोसमात लोकांना गरमागरम समोसे, भजी आणि अनेक प्रकारचे स्नॅक्स खायला आवडतात. संध्याकाळच्या चहासोबत चटपटीत चाट मिळाली, तर चहाची मजा द्विगुणित होते. संध्याकाळसाठी चाट हा नाश्त्याचा एक चांगला पर्याय आहे. अनेकांना चाट पदार्थ घरी बनवणं त्रासदायक वाटत असेल, पण आज आम्ही तुम्हाला चाट अगदी सोप्या आणि झटपट बनेल, असा एक पदार्थ सांगणार आहोत.
ब्रेड आणि बटाट्याने मसालेदार चाट घरच्या घरी बनवता येते. जर, घरात ब्रेडचे अगदी 2-3 स्लाईस शिल्लक असतील, तरी त्यापासून ही चाट बनवता येईल. हेल्दी आणि टेस्टी चाट बनवण्यासाठी बटाटा, ब्रेड, टोमॅटो, कोथिंबीर, कांदे, जिरेपूड, मीठ, लाल तिखट, चाट मसाला, दही, शेव आणि चिंचेची व हिरवी चटणी हे साहित्य लागेल. चला रेसिपी जाणून घेऊया...
ब्रेड-बटाटा चाट रेसिपी
* सर्व प्रथम एका कढईत तेल किंवा तूप गरम करा.
* आता त्यात ब्रेड सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्या.
* आता ब्रेड बाहेर काढून वेगळ्या प्लेटमध्ये ठेवा.
* उकडलेले बटाटे सोलून मॅश करून, त्यात चिरलेला टोमॅटो, कोथिंबीर आणि कांदा घाला.
* बटाट्याच्या मिश्रणात जिरेपूड, मीठ, थोडे लाल तिखट, चाट मसाला घालून व्यवस्थित मिक्स करा.
* बटाट्याचे हे मिश्रण ब्रेडवर ठेवा. त्यावर फेटलेले दही, हिरवी चटणी, चिंचेची चटणी घाला.
* आता त्यावर भुजिया शेव किंवा पापडी असेल तर बारीक करून भुरभुरा.
* शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि डाळिंबाच्या काही दाण्यांनी चटपटीत चाट सजवा.
* तुमच्या चवीनुसार त्यात हिरवी मिरची बारीक चिरूनही घालू शकता.
हेही वाचा :
- Covid-19: कोरोनापासून बचाव करण्यासठी जीवनशैलीत 'असा' बदल करा, संसर्ग होणार नाही
- Covid19 : इम्युनिटी वाढवतात 'या' गोष्टी, ओमायक्रॉनपासूनही होईल संरक्षण
- Omicron Variant Alert : ओमायक्रॉनपासून बचाव करण्यासाठी 'या' गोष्टींकडे करू नका दुर्लक्ष, अन्यथा...
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha