Share Market : शेअर बाजारातील घसरण आजही कायम राहिली आहे. आज शेअर बाजार बंद होताना सेन्सेक्स 76.71 अंकांनी घसरला आहे तर निफ्टीही 5.50 अंकानी घसरला आहे. सेन्सेक्समध्ये 0.13 टक्क्यांची घसरण होऊन तो 57,200.23 वर पोहोचला आहे तर निफ्टीमध्ये 0.03 टक्क्यांची घसरण होऊन तो 17,104.70 वर पोहोचला आहे. अमेरिकेच्या फेड रिझर्व्हच्या व्याज दरात वाढ करण्याच्या निर्णयाचा आणि भारताच्या आगामी बजेटचा चांगलाच परिणाम शेअर बाजारावर होताना दिसत आहे. 


सेन्सेक्स सकाळी वधारला, बंद होताना घसरला
आज सकाळी शेअर बाजार सुरू होताच सेन्सेक्स 550 अंकांनी वधारला होता. शेअर बाजाराची सुरुवात झाली तेव्हा निर्देशांक गॅप अपने सुरू झाला. आज ट्रेडिंग सत्रात निफ्टी 98 अंकांनी वधारत 17208 अंकावर सुरू झाला होता. तर, सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास सेन्सेक्स 722 अंकांनी वधारल्याचं दिसून आलं होतं. तर, निफ्टी 232 अंकांनी वधारला होता. 


सकाळी निफ्टीमध्ये आज 50 पैकी 48 स्टॉक वधारले होते. बँक निफ्टीतही तेजी दिसून आली होती.  बँक निफ्टीत 300 अंकांनी उसळण दिसून आली. वित्त, आॅईल ॲंड गॅस, आयटी, ऑटो आणि मेटलच्या क्षेत्रात तेजी दिसून आली. टाटा स्टील, एअरटेल आणि टायटनच्या शेअर्सचे दर वधारले होते. 


पण शेअर मार्केट बंद होईपर्यंत ही परिस्थिती पूर्ण बदलली. शेअर मार्केट बंद होताना सेन्सेक्स 76 अंकांनी घसरला तर निफ्टीही 5.50 अंकांनी घसरल्याचं दिसून आलं. 


महत्त्वाच्या बातम्या :