Travel : नवीन वर्ष त्यात उन्हाळी सुट्टी.. अशात तुम्ही काही नवीन ठिकाणी भेट देण्याचा विचारही करत आहात... तर लांब कशाला.. तुम्ही महाराष्ट्रातच (Maharashtra) फिरू शकता. महाराष्ट्रातील निसर्गसौंदर्याबद्दल बोलायचं झालं तर इथली बातच न्यारी..! निसर्गाचं अभूतपूर्व वरदान लाभलेली एकापेक्षा एक पर्यटन स्थळं या ठिकाणी आहेत. महाराष्ट्रात भेट देण्यासारखी स्थळं बरीच आहेत, कदाचित लोकांना माहित नसलेली ठिकाणे देखील आहेत. येथे आम्ही तुमच्यासोबत महाराष्ट्रातील अशाच काही ठिकाणांची माहिती शेअर करत आहोत, ज्यांचे दृश्य अतिशय उत्तम आहे. आणि विशेष म्हणजे तुमची फोटोग्राफीची आवडही पूर्ण होणार आहे. सविस्तर माहिती जाणून घ्या..
लोणार सरोवर
प्रवाशांसाठी आकर्षणाचे केंद्र मानले जाणारे लोणार सरोवर हे पर्यटकांसाठी एक मनोरंजक पर्यटन स्थळ आहे. हे सरोवर उल्का कोसळल्यामुळे तयार झाल्याचे सांगण्यात येते. जगात अशी फक्त चार सरोवरे आहेत. याला क्रेटर लेक असेही म्हणतात.
डहाणू
मुंबईपासून काही तासांच्या अंतरावर असलेले डहाणू हे एक सुंदर समुद्रकिनारी असलेले शहर आहे, जिथे स्वच्छ आणि निर्मळ समुद्रकिनारे पाहायची संधी तुम्हाला मिळते. ऐतिहासिक सौंदर्य, टुमदार बंगले आणि चिकूच्या बागांचे दृश्य, आकर्षक समुद्रकिनारा शहर तुमच्या फोटोग्राफी पोर्टफोलिओसाठी सर्वोत्तम आहे.
कोकण किनारा
कोकण किनाऱ्यासारखा दुसरा समुद्रकिनारा असण्याची शक्यता नाही. तारकर्ली वॉटर स्पॉट्स, आश्चर्यकारक समुद्रकिनारे, पाण्याचे रंग आणि फोटोग्राफिक दृश्ये ही येथील प्रमुख आकर्षणे आहेत. येथील पांढरे वालुकामय किनारे आणि निळे पाणी आकर्षित करतात. हे खरोखर एक भारी ठिकाण आहे.
ड्यूक नोज
तुम्ही ट्रेक करण्यासाठी एखादे ठिकाण शोधत असाल, तर तुम्ही ड्यूक नोजच्या उंचीबद्दल ऐकले असेल. लोणावळा आणि खंडाळा या प्रमुख हिल स्टेशनजवळ असल्याने हे ठिकाण अनेकदा कोणाच्या लक्षात येत नाही. हे ठिकाण तसे हॉथॉर्न पीक म्हणूनही ओळखले जाते, हे रॉक क्लाइंबिंग, रॅपलिंग आणि पर्वतीय साहसी खेळांसाठी एक उत्तम ठिकाण आहे.
चिखलदरा
चिखलदरा परिसरात अनेक तलाव, आकर्षक दृश्ये आणि सुंदर मंदिरे आहेत, ज्यांना पाहण्यासाठी लोक लांबून येतात. ही जागा कॉफीच्या बागांपेक्षाही चांगली आहे.
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )
हेही वाचा>>>
Travel : मूड फ्रेश होईल..जेव्हा उन्हाळ्यात हिल स्टेशन फिरण्याची इच्छा होईल पूर्ण! भारतीय रेल्वेचे स्वस्त पॅकेज एकदा पाहाच