Travel : एकतर उन्हाळा... त्यात गरमी इतकी की बाहेर पडणं अवघड झालंय..कामानिमित्त जरी बाहेर निघायचं म्हटलं तरी जीव नकोसा होतो. घामाने शरीर अगदी ओलचिंब होतं. अशात जर काही काळासाठी का होईना शांतता आणि सुखद गारव्याची अनुभूती लाभली तर बरं होईल असे वाटते. म्हणूनच जर तुम्हीही पर्वतप्रेमी असाल.. 3 ते 4 दिवसांच्या सहलीचे नियोजन करत असाल तर तुम्ही भारतीय रेल्वेच्या पॅकेजमधून सहलीचे नियोजन करू शकता.
भारतीय रेल्वेच्या या पॅकेजमध्ये काय सुविधा आहेत?
भारतीय रेल्वेच्या या पॅकेजेसमध्ये तुम्हाला हॉटेलच्या निवासासह सर्व सुविधा दिल्या जातात. देशात एकापेक्षा एक पर्यटन स्थळे असून, तेथे पर्यटकांची मोठी गर्दी असते. येथे तुम्ही ट्रेकिंग आणि कॅम्पिंग करू शकता. ढग अगदी जवळून पाहता येतात आणि उन्हाळ्यात थंडी जाणवते. जर तुम्ही एप्रिल किंवा मे महिन्यात डोंगरावर जाण्याचा विचार करत असाल तर भारतीय रेल्वेच्या पॅकेजमधून जा. भारतीय रेल्वेने (IRCTC) तुमच्यासाठी एक उत्तम टूर पॅकेज आणले आहे.
गुलमर्ग, पहलगाम, सोनमर्ग आणि श्रीनगर
या टूर पॅकेजसाठी तुम्ही चंदीगड, हैदराबाद आणि लखनऊ येथून प्रवास करू शकाल.या सर्व ठिकाणांसाठी पॅकेज फी भिन्न आहेत.हे पॅकेज 5 रात्री आणि 6 दिवसांसाठी आहे.तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत चंदीगडहून टूर पॅकेज करत असाल तर, दोन लोकांसोबत प्रवास करणाऱ्या प्रति व्यक्ती पॅकेजची फी 32,200 रुपये आहे.चंदीगड येथून हे पॅकेज 20 एप्रिलपासून सुरू होत आहे.जर तुम्ही हैदराबादहून सहलीची योजना आखत असाल तर, दोन लोकांसोबत प्रवास करणाऱ्या प्रति व्यक्ती पॅकेज फी रु 52930 आहे.
हैदराबादचे पॅकेज 19 एप्रिलपासून सुरू होत आहे.लखनौचे पॅकेज 18 एप्रिलपासून सुरू होत आहे. या पॅकेजसह दोन लोकांसोबत प्रवास करण्यासाठी प्रति व्यक्ती पॅकेज शुल्क 48,300 रुपये आहे.पॅकेजमध्ये तुमचे हॉटेल, फ्लाइट-ट्रेनची तिकिटे आणि जेवणाचा खर्च समाविष्ट आहे.या पॅकेजेसद्वारे तुम्हाला गुलमर्ग, पहलगाम, सोनमर्ग आणि श्रीनगर या प्रसिद्ध ठिकाणांना भेट देण्याची संधी मिळेल.
लेह आणि लडाख टूर पॅकेज
या पॅकेजसाठी तुम्ही दिल्ली, हैदराबाद, मुंबई आणि इंदूर येथून तिकीट बुक करू शकता.हे पॅकेज 6 रात्री आणि 7 दिवसांसाठी आहे.पॅकेजचे शुल्क स्थानानुसार बदलते.दिल्ली ते लेह- लडाख जर 2 लोक एकत्र प्रवास करत असतील तर प्रति व्यक्ती पॅकेज फी 53,000 रुपये आहे.हे पॅकेज 27 एप्रिलपासून सुरू होत आहे.जर तुम्ही मुंबईहून सहलीची योजना आखत असाल तर, दोन लोकांसोबत प्रवास करण्यासाठी प्रति व्यक्ती पॅकेज फी 59500 रुपये आहे.हे पॅकेज 20 मे पासून सुरू होत आहे.तुम्ही भारतीय रेल्वेच्या अधिकृत वेबसाइटवरून पॅकेज बुक करू शकता.
हैदराबादहून प्रवास करणाऱ्यांना पॅकेजसाठी 60755 रुपये मोजावे लागतील.हे पॅकेज 21 मेपासून सुरू होत आहे.हे पॅकेज 7 दिवसांसाठी तुमच्या सर्व सुविधांची काळजी घेईल.इंदूरचे पॅकेज 28 जूनपासून सुरू होणार आहे.दोन लोकांसह प्रवास करण्यासाठी प्रति व्यक्ती पॅकेज शुल्क 61650 रुपये आहे.
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )
हेही वाचा>>>
