Travel : शहराच्या गजबजाटापासून दूर... शांत...निवांत..आणि निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवायचा असेल तर भारतातील अंदमान हे ठिकाण सर्वोत्तम पर्याय आहे, अनेकांचे स्वप्न असते, अशा ठिकाणी भेट देण्याचे, जिथे व्यस्त जीवनातून ब्रेक घेऊन काही वेळ स्वत:साठी जगता येईल, जर तुम्हालाही अंदमानचे सौंदर्य जवळून पाहायचे असेल तर तुम्ही सप्टेंबरमध्ये प्लॅन करू शकता, कारण IRCTC म्हणजेच भारतीय रेल्वेने खूप चांगले टूर पॅकेज आणले आहे, ज्यामध्ये तुम्ही तुमच्या बजेटमध्ये येथे जाण्यासाठी प्लॅन करू शकता.
अंदमानला भेट देण्याचा खरा सीझन पावसाळ्यानंतर..!
अंदमान हे केवळ हनिमून डेस्टिनेशनसाठी प्रसिद्ध नाही, तर तुम्ही इथे मित्रांसोबत किंवा एकट्याने पर्यटनाचा आस्वाद घेऊ शकता. अंदमानला भेट देण्याचा खरा सीझन पावसाळ्यानंतर सुरू होतो, पण इथे जाणं तितकं स्वस्त नाही, जर तुम्हालाही असं वाटत असेल, तर तुम्ही IRCTC म्हणजेच भारतीय रेल्वेसोबत प्लॅनिंग करून अगदी कमी बजेटमध्ये तुमची अंदमानची सहल मॅनेज करू शकता. पॅकेजशी संबंधित सर्व महत्त्वाचे तपशील जाणून घ्या.
पॅकेजचे नाव- Alluring Andaman Ex Kochi
पॅकेज कालावधी- 5 रात्री आणि 6 दिवस
प्रवास - फ्लाइट
कव्हर केलेले डेस्टीनेशन - हॅवलॉक, नील, पोर्ट ब्लेअर
तुम्हाला या सुविधा मिळतील
-राहण्यासाठी हॉटेलची सोय असेल.
-तुम्हाला राउंड ट्रिप फ्लाइटसाठी इकॉनॉमी क्लासचे तिकीट मिळेल.
-या टूर पॅकेजमध्ये नाश्ता आणि रात्रीचे जेवण उपलब्ध असेल.
प्रवासासाठी एवढी रक्कम आकारली जाईल
या ट्रिपमध्ये तुम्ही एकटे प्रवास करत असाल तर तुम्हाला 64,420 रुपये मोजावे लागतील.
दोन लोकांना प्रति व्यक्ती 51,350 रुपये द्यावे लागतील.
तीन लोकांना प्रति व्यक्ती 50,900 रुपये शुल्क भरावे लागेल.
तुम्हाला मुलांसाठी वेगळे पैसे भरावे लागतील.
बेडसाठी (5-11 वर्षे) तुम्हाला 46,250 रुपये द्यावे लागतील, तर बेडशिवाय तुम्हाला 42,850 रुपये द्यावे लागतील.
IRCTC ने ट्विट करून दिली माहिती
IRCTC ने या टूर पॅकेजची माहिती देणारे ट्विट शेअर केले आहे. ज्यामध्ये असे म्हटले आहे की, जर तुम्हाला अंदमानचे सुंदर नजारे बघायचे असतील, तर तुम्ही IRCTC च्या या अप्रतिम टूर पॅकेजचा लाभ घेऊ शकता.
अशी बुकिंग करू शकता
तुम्ही या टूर पॅकेजसाठी IRCTC च्या अधिकृत वेबसाइटवरून बुक करू शकता. याशिवाय, आयआरसीटीसी पर्यटक सुविधा केंद्र आणि क्षेत्रीय कार्यालयांमधूनही बुकिंग करता येते. पॅकेजशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही IRCTC अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकता.
हेही वाचा>>>
Travel : साईंचं बोलावणं..! भारतीय रेल्वे तुमची शिर्डीला जाण्याची इच्छा पूर्ण करणार, कमी बजेटमध्ये टूर पॅकेज लाँच
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )