Travel : आज रामनवमी... आज संपूर्ण भारत राममय झालेला दिसत आहे. रामनवमी निमित्त भाविक ठिकठिकाणी श्रीराम मंदिरात दर्शनासाठी जातात. एकत्रच अनेक भाविक आल्याने गर्दी निर्माण होते. आणि याच गर्दीच्या भीतीने तुम्ही रामनवमीच्या दिवशी अयोध्येत दर्शनासाठी जात नसाल, तर कर्नाटकात असलेल्या या खास मंदिरात जाण्याचा विचार तुम्ही करू शकता. या मंदिराचा इतिहास अनेक वर्षांचा आहे.


भगवान श्रीराम तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करतील!


यंदा 17 एप्रिल रोजी देशभरात श्री रामाचा सण म्हणजेच रामनवमी मोठ्या थाटामाटात साजरी होणार आहे. या विशेष सणानिमित्त लोक काही ऐतिहासिक मंदिरात जाऊन देवाचे दर्शन घेण्याचा विचार करत आहेत. आजच्या लेखात आम्ही तुम्हाला अशा मंदिराबद्दल सांगणार आहोत, जिथे तुम्ही गेल्यास तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील. रामनवमीला मंदिरात दर्शन घेणाऱ्या लोकांच्या सर्व मनोकामना देव पूर्ण करतात, असे मानले जाते. दरवर्षी रामनवमीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. मंदिराजवळ तुम्हाला मोठी जत्रा देखील दिसेल.


 




कोदंडा रामास्वामी मंदिर, कर्नाटक


तुंगभद्रा नदीच्या काठावर वसलेले हे सुंदर मंदिर रामाला समर्पित आहे. हे मंदिर परिसरातील सर्वात मोठे राम मंदिर आहे. हे मंदिर होयसाळ शिल्प शैलीत बांधले आहे. ही शैली कर्नाटकच्या दक्षिणेकडील प्रदेशात विकसित झाली. देशातील असे हे पहिले मंदिर आहे, जिथे माता सीता श्रीरामांच्या उजव्या बाजूला आहे. याच ठिकाणी श्रीरामांनी माता सीतेला उजव्या बाजूला आणि लक्ष्मणाला डाव्या बाजूला ठेवून भगवान परशुरामांची इच्छा पूर्ण केली होती, असे मानले जाते. या मंदिरात दरवर्षी लोक राम आणि सीता माता यांच्या लग्नाचा दिवस साजरा करतात. हे मंदिर इसवी सन 14 व्या शतकात बांधले गेले असे मानले जाते. याच मंदिरात परशुरामांनी श्रीराम सीता आणि लक्ष्मणासह दर्शन घेतले होते. हे कर्नाटकातील प्रसिद्ध राम मंदिर आहे.


 




मंदिराशी संबंधित माहिती



येथे तुम्हाला लक्ष्मणजींचे वेगळे मंदिर पाहायला मिळेल.
मंदिर पहाटे 5 ते रात्री 8 पर्यंत खुले असते.
तुम्ही मंदिरात शॉर्ट्स, स्कर्ट किंवा जीन्ससारखे कपडे घालू शकत नाही.
पान, गुटखा, सिगारेट यांसारख्या वस्तू राम मंदिरात नेण्यास मनाई आहे.



कोदंडा रामास्वामी मंदिर कोठे आहे?


हे मंदिर चिकमंगळूरपासून 5 किलोमीटर अंतरावर आहे. तुम्ही केमनगुंडीहून येत असाल तर तुम्हाला 66 किलोमीटरचे अंतर कापावे लागेल.
जवळचे रेल्वे स्टेशन- मंदिर भाकरपेट रेल्वे स्टेशनपासून 8.2 किमी अंतरावर आहे.
कडप्पा रेल्वे स्टेशनपासून अंतर 25.9 किमी आहे.
तिरुपतीपासून मंदिराचे अंतर 117 किमी आहे.