Travel : अनेकांचे स्वप्न असते की आयुष्यात एकदा तरी स्वित्झर्लंडला (Switzerland) जाणार, कारण तिथल्या निसर्ग सौंदर्याची गोष्टच निराळी आहे, मात्र तुम्हाला माहित आहे का? भारतात अशी काही ठिकाणं आहेत, जी परदेशातील प्रचलित पर्यटन स्थळांनाही मागे टाकतील. उत्तराखंड (Uttarakhand) हे देशातील एक असे राज्य आहे, जिथे केवळ स्थानिकच नाही तर परदेशी पर्यटकही भेट देण्यासाठी येतात. या सुंदर राज्याला देवांची भूमी असेही म्हणतात. उत्तराखंडच्या सुंदर खोऱ्यांमध्ये अशी अनेक आश्चर्यकारक आणि अनोखी ठिकाणे आहेत, ज्याला भेट देणे अनेक पर्यटकांसाठी एक स्वप्न असू शकते. उत्तराखंडमधील हिमालयाच्या कुशीत वसलेला पंचचुली पर्वत (Panchchuli Mountain) हे असेच एक ठिकाण आहे.


 





उत्तराखंडमधील पंचचुली पर्वत कोठे आहे?


भारतातील उत्तराखंडला देवांची भूमी म्हटले जाते. जर तुम्ही उत्तराखंडला भेट देण्याचा विचार करत असाल तर यावेळी तुम्ही पंचचुली पर्वत नक्की पाहा. हा पर्वत स्वर्गापेक्षा कमी नाही. पंचचुली पर्वत उत्तराखंडच्या पूर्व कुमाऊं प्रदेशाच्या शेवटी दर्मा खोऱ्यातील दुग्तू गावाजवळ आहे. पंचचुली पर्वत हा हिमालयाच्या पाच बर्फाच्छादित शिखरांचा समूह आहे. म्हणून त्याला पंचचुली पर्वत असेही म्हणतात. समुद्रसपाटीपासून 6 हजार मीटरपेक्षा जास्त उंचीवर असलेले माउंट पंचचुली हे हिमालयाच्या कुशीत लपलेले स्वर्ग मानले जाते. हे भारत आणि तिबेट सीमेवर स्थित आहे. 


 


पंचचुली पर्वताची खासियत


पंचचुली पर्वताची खासियत जाणून घेतल्यानंतर तुम्हीही या पर्वताला भेट देण्यास आतुर व्हाल. कारण इथे पाच आश्चर्यकारक आणि सुंदर पर्वतांचे दृश्य तुमचे मन मोहतील. हे पाच पर्वत पाहिल्यावर स्वर्ग काही पावलांच्या अंतरावर आहे असेच भासते. पंचचुली पर्वत वर्षाच्या जवळजवळ प्रत्येक महिन्यात बर्फाच्या चादरीने झाकलेला असतो. जेव्हा सूर्याची किरणे पंचचुली पर्वतावर पडतात तेव्हा सर्वत्र लालसरपणा दिसतो. ते दृश्य कमाल असते. इथे आकाशातील तारे असे चमकतात. जणू कोणीतरी अवकाशात डुबकी मारत आहे. बर्फवृष्टीदरम्यान या पर्वताचे सौंदर्य म्हणजे जणू स्वर्गसुखच असते.


 




पंचचुली पर्वताची पौराणिक कथा


पंचचुली पर्वताची पौराणिक कथा खूप मनोरंजक आहे. पंचचुली पर्वताविषयी असे म्हटले जाते की, पाच पांडवांनी पर्वताच्या पाच ठिकाणी पाच चूली बांधल्या होत्या, त्यामुळे अनेक लोक या ठिकाणाचा महाभारताशीही संबंध जोडतात. पंचचुली पर्वताविषयीची आणखी एक समज अशी आहे की, धार्मिक ग्रंथांमध्ये याला पंचशिरा पर्वत म्हणून ओळखले जाते. या पाच पर्वतांना युधिष्ठिर, अर्जुन, भीम, नकुल आणि सहदेव या नावांनीही ओळखले जाते, असा अनेकांचा समज आहे.


 


 


 


(टिप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Travel : एक नयनरम्य अनुभव! हिमाचलची सुंदर व्हॅली 'ही' स्वर्गापेक्षा कमी नाही, शुभ्र पाण्याचे धबधबे तुम्हाला घालतील भुरळ!