Travel : पृथ्वीवरील स्वर्ग म्हणतात 'स्वित्झर्लंडला,.. अनेकांच्या बकेट लिस्टमध्ये हे ठिकाण नक्की असतं. अगदी बॉलीवूडपासून अनेक जोडप्यांसाठी हे एक रोमॅंटिक डेस्टीनेशन आहे. जर तुम्हालाही इथला अनुभव घ्यायचा असेल तर आज आम्ही तुम्हाला भारतातून स्वित्झर्लंडला स्वस्तात प्रवास कसा करायचा..सोबतच इथे जाण्याचा खर्च, या देशातील पर्यटन स्थळांबद्दल जाणून घ्या..
बॉलीवूडपासून अनेक जोडप्यांची पहिली पसंत
स्वित्झर्लंड आपल्या अप्रतिम नैसर्गिक सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे. इथे बर्फानी झाकलेल्या टेकड्या, तलाव, धबधबे आणि सुंदर हिरवळ जणू स्वर्गच वाटतात. स्वित्झर्लंडमधील दृश्ये अनेकदा चित्रपटांमध्ये दाखवली जातात, जिथे नायक आणि नायिका एकमेकांवर रोमान्स करताना दिसतात. जोडप्यांना विशेषतः अशी दृश्ये आवडतात, म्हणून ते आपलं हनिमून डेस्टीनेशन म्हणून पहिली पसंत स्वित्झर्लंडला देतात. बहुतेक भारतीयांसाठी स्वित्झर्लंडची ट्रीप एखाद्या स्वप्नासारखी असते. चित्रपटांमध्ये स्वित्झर्लंडची दृश्ये पाहून अनेकांना या ठिकाणी स्वर्गसुख अनुभवण्याचे स्वप्न पाहतात, पण बहुतेकदा आर्थिक कमतरते अभावी परदेशात जाणे थोडे कठीण वाटते. म्हणून आज आम्ही तुम्हाला स्वित्झर्लंड ट्रीपचे प्लॅनिंग आणि सूचनांचा अवलंब करून तुम्ही स्वस्तात स्वित्झर्लंडला कसे जाऊ शकता, याबाबत सांगणार आहोत.
कमी खर्चात स्वित्झर्लंडला कसे जायचे?
भारत ते स्वित्झर्लंड हे अंतर अंदाजे 6187किमी आहे. तुम्ही नवी दिल्ली ते स्वित्झर्लंड पर्यंत फ्लाइटने जाऊ शकता, सुमारे 11.34 तासांचा प्रवास केल्यानंतर तुम्ही तुमच्या डेस्टिनेशनला पोहोचू शकता.
स्वित्झर्लंडची फ्लाइट तिकिटे
नवी दिल्ली ते स्वित्झर्लंड पर्यंत स्वस्त विमान तिकिटे अनेक वेबसाइटवर उपलब्ध आहेत.
ऑफ सीझनमध्ये प्रवास करताना तिकीट आणि हॉटेल्स स्वस्त होतात.
भारत ते स्वित्झर्लंडच्या विमानाच्या तिकिटाची किंमत प्रति व्यक्ती सुमारे 30 हजार रुपये असू शकते.
स्वित्झर्लंडची बजेट ट्रिप
फ्लाइट तिकिटांव्यतिरिक्त, बजेट हॉटेल्स आगाऊ ऑनलाइन बुक करा. तुम्हाला स्वस्त किमतीत अनेक बजेट फ्रेंडली हॉटेल्स, होमस्टे किंवा गेस्ट हाऊस मिळतील. स्वित्झर्लंडमध्ये प्रवास करण्यासाठी, तुम्ही सार्वजनिक वाहतूक वापरू शकता जी कार किंवा टॅक्सीपेक्षा स्वस्त आहे. याशिवाय स्विस ट्रॅव्हल पासही बनवता येतो. हा पास पर्यटकांसाठी डिझाइन केला आहे, ट्रेन, बस किंवा बोटीने तुम्हाला प्रवास करता येऊ शकतो.
स्वित्झर्लंडमध्ये भेट देण्याची ठिकाणे
मेटरहॉर्न पर्वत
जंगफ्राउजोच काठी
ट्रुमेलबॅक फॉल्स,
स्टॉबॅच फॉल्स
पिलाटस पर्वत
हेही वाचा>>>
Monsoon Travel : वीकेंड खास ... ट्रीपही खास! लोणावळा, खंडाळाशिवाय पावसाळ्यात 'ही' ठिकाणं म्हणजे स्वर्गसुखच..! टेन्शन विसरून कराल एन्जॉय
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )