Travel : आपण अनेकदा पाहतो, काही जोडप्यांचं लग्न काही कारणांमुळे जमत नाही, एकतर त्यांचे कुटुंबीय त्यांच्या लग्नासाठी तयार नसतात, किंवा इतर काही अडचणी येतात. या जोडप्यांना जेव्हा काहीच मार्ग सापडत नाही, तेव्हा त्यांना देवाचा आधार घ्यावा लागतो. आज आम्ही तुम्हाला भारतातील अशा काही शिवमंदिरांबद्दल सांगणार आहोत, जे खास जोडप्यांसाठी प्रसिद्ध आहे. या मंदिरांच्या दर्शनाने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात, अशी भाविकांची धारणा आहे. 


 



या मंदिरांच्या दर्शनाने मनोकामना पूर्ण होतात, भाविकांची श्रद्धा


देश-विदेशात शिवाची अनेक मंदिरे आहेत, ज्यांना लोक चमत्कारी मानतात. या मंदिरात गेल्याने आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात अशी अनेकांची श्रद्धा आहे. अशी काही मंदिरे जोडप्यांसाठी खास मानली जातात. भाविकांची अशी धारणा आहे की, जे जोडपे आपल्या नात्याचे लग्नात रुपांतर करू इच्छितात, परंतु त्यांचे कुटुंबीय त्यासाठी तयार नसतात, तेव्हा भगवान शिवाच्या या मंदिरांमध्ये पूजा करून त्यांना मदत करतात. या मंदिरांच्या दर्शनाने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. भोलेनाथाची पूजा केल्याने चांगला पती प्राप्त होतो. तसेच भाविकांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात असा समज आहे. देशात अशी अनेक मंदिरं आहेत, जिथे लोक लग्नाआधी आणि नंतर आपल्या जोडीदारासोबत जातात.





वेमुलवाडा राजराजेश्वर मंदिर - मनोकामना पूर्ण करणारे मंदिर


वेमुलवाडा राजराजेश्वर मंदिर हे तेलंगणातील राजन्ना सिरसिल्ला जिल्ह्यातील वेमुलवाडा देवस्थानम येथे आहे. हे मंदिर बांधकामशैली आणि पावित्र्य या दोन्हीसाठी प्रसिद्ध आहे. हे मंदिर हैदराबादपासून सुमारे 150 किमी अंतरावर आहे. असे मानले जाते की, हे मंदिर 8 व्या-10 व्या शतकात बांधले गेले होते. मंदिरात तुम्हाला धर्म गुंडम जल तलाव दिसेल. हा तलाव अत्यंत पवित्र मानला जातो. प्रत्येकाने येथील धर्मगुंड पाण्यात पवित्र स्नान करावे, अशी येथे दर्शनासाठी येणाऱ्या लोकांची श्रद्धा आहे. कारण असे केल्याने त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील. तसेच हा छोटासा जलाशय अनेक आरोग्यदायी फायदेही देतो.





श्री कल्याण सुंदरेश्वर मंदिर - विवाहित लोकांसाठी आणि लग्न करू इच्छिणाऱ्यांसाठी


श्री कल्याण सुंदरेश्वर मंदिर हे तामिळनाडूच्या नागापट्टिनम जिल्ह्यातील थिरुमनम चेरी येथे आहे. हे मंदिर विवाहित लोकांसाठी आणि लग्न करू इच्छिणाऱ्यांसाठी मानले जाते. लग्नाशी संबंधित दोष दूर करण्यासाठी मंदिरात पूजा केली जाते. असे मानले जाते की, हे ते मंदिर आहे जेथे भगवान शिव आणि देवी पार्वती यांचा विवाह झाला होता. यासोबतच लग्न करू इच्छिणाऱ्यांसाठीही हे मंदिर चांगले मानले जाते. हे भगवान शिवाच्या सर्वात प्रसिद्ध मंदिरांपैकी एक आहे.


 







त्रियुगीनारायण - डेस्टिनेशन वेडिंग वेन्यू म्हणून प्रसिद्ध


हे मंदिर उत्तराखंडच्या रुद्रप्रयाग जिल्ह्यात आहे. हे मंदिर भगवान विष्णूला समर्पित असले तरी हे स्थान भगवान शिव आणि देवी पार्वतीच्या विवाहाशी संबंधित आहे. हे मंदिर डेस्टिनेशन वेडिंग वेन्यू म्हणून प्रसिद्ध आहे. येथे लोक दुरून लग्न करण्यासाठी येतात. असे मानले जाते की या मंदिरात लग्न केल्याने नातं मजबूत होतं. 


 


टीप : येथे दिलेली मंदिर आणि भक्तीविषयक माहिती धार्मिक श्रद्धांवर आधारित आहे. हे केवळ लोकांच्या श्रद्धा आणि आदराच्या आधारावर दिले जातात. यासाठी कोणताही वैज्ञानिक पुरावा नाही.


 


हेही वाचा>>>


Travel : साईंचं बोलावणं..! भारतीय रेल्वे तुमची शिर्डीला जाण्याची इच्छा पूर्ण करणार, कमी बजेटमध्ये टूर पॅकेज लाँच 


 


 


 


(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )