Travel : परीक्षा संपताच मे महिन्याची सुट्टी लागली म्हणजे मुलांसाठी आनंदाचा सोहळा असतो. मुलं या सुट्ट्यांची आतुरतेने वाट पाहत असतात. ही अशी वेळ असते, जेव्हा मुलांना मजा करण्यापासून कोणीही रोखत नाही. सुट्टी लागल्यावर कुठे फिरायला जायचं? काय करायंच? काय खायचं? अशा विविध गोष्टींचं प्लॅनिंग आधीच केले जाते. उन्हाळ्याच्या सुरुवातीच्या (Summer Vacation) दिवसांमध्ये, विशेषत: मे महिन्यात लोक त्यांच्या संपूर्ण कुटुंबासह कुठेतरी प्रवास करण्याचा विचार करतात. कमी बजेटमध्ये तुम्ही अनेक ठिकाणांना भेट देण्याचा विचार करू शकता. या सुट्यांमध्ये मुलांना प्रवासाची संधीही मिळते. मुलांच्या शाळांना सुट्या लागल्या की, पालक त्यांना कुठेतरी घेऊन जाण्याचा बेत आखतात.


मे महिन्यात फिरण्याचा प्लॅन करताय? 


तुम्हालाही या सुट्यांमध्ये तुमच्या मुलांना कुठेतरी घेऊन जायचे असेल, तर हा लेख तुमच्यासाठी उपयुक्त ठरेल. कारण आजच्या लेखात आम्ही तुम्हाला अशाच काही ठिकाणांबद्दल सांगणार आहोत, जिथे तुम्ही कमी बजेटमध्ये प्रवास करून परत येऊ शकता.





 


हिमाचल प्रदेश



उन्हाळ्याच्या सुट्टीत तुम्हाला हिरवीगार झाडं आणि सुंदर दृश्यांचा आनंद घ्यायचा असेल, तर तुम्ही या ठिकाणी जाण्याचा प्लॅन करू शकता. येथील हवामान थंड आहे. मुलांना या ठिकाणांना भेट देऊन मजा येईल. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे येथे जाण्यासाठी तुम्हाला फक्त 10 हजार रुपये मोजावे लागतील. जर तुम्ही बजेट ट्रिपची योजना आखत असाल तर तुम्ही येथे जाण्याचा विचार करू शकता. हिमाचल प्रदेशात भेट देण्यासाठी अनेक चांगली ठिकाणे आहेत.





जैसलमेर



सुट्टीत तुम्ही मुलांना जैसलमेरला घेऊन जाण्याची योजना आखू शकता. मुलांना ही जागा आवडेल. येथे उंट आणि हत्तीची सवारी करता येते. तसेच, तुम्ही मुलांसोबत तंबूत रात्र घालवू शकता. येथे तुम्ही पटावों की हवेली, गडीसर तलाव आणि खाबा किल्ला यासारख्या ठिकाणांना भेट देऊ शकता. जैसलमेर मध्ये मुलांसाठी बघण्यासाठी ही चांगली ठिकाणे आहेत.




 
लोणावळा


हे ठिकाण कुटुंबासह भेट देण्यासाठी सर्वोत्तम आहे. हे एक उत्तम सुट्टीचे ठिकाण आहे. येथे तुम्ही मुलांसोबत 4 दिवस फिरू शकता. तुम्हाला फक्त 10,000 रुपयांमध्ये कुटुंबासोबत लहान सहलीची योजना करायची असेल, तर हे महाराष्ट्राजवळील सर्वोत्तम ठिकाण आहे.


 




पुष्कर


तुम्ही मुलांसोबत पुष्करला भेट देण्याची योजना देखील करू शकता. हे भारतातील सर्वात जुन्या शहरांपैकी एक आहे. पुष्कर तीन बाजूंनी डोंगरांनी वेढलेले आहे. हे ठिकाण हिंदू भाविकांच्या पाच पवित्र तीर्थक्षेत्रांपैकी एक आहे. मुलांबरोबरच तुम्हालाही येथे शांतता जाणवेल.




जयपूर-उदयपूर


राजस्थानची राजधानी जयपूर आपल्या सौंदर्यासाठी भारतभर ओळखली जाते. तुम्हाला 4 ते 5 दिवसांची ट्रिप प्लॅन करायची असेल, तर तुम्ही जयपूर आणि उदयपूरला जाण्याचा प्लॅन करू शकता. येथे तुम्हाला अनेक ठिकाणे भेटायला मिळतील.


 


(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Travel : भर उन्हात टेन्शन विसराल! जेव्हा 'या' थंडगार धबधब्याचं स्वर्गसुख अनुभवाल.. एकदा भेट देऊन तर बघा...