Travel : काय तो नितळ समुद्र.. काय ती हिरवळ.. पांढरी वाळू अन् फोटोसाठी झक्कास नजारा, इथलं निसर्गसौंदर्य तुम्हाला अक्षरश: वेड लावेल, आणि हे सगळं पाहून तुम्ही फॉरेन विसराल, कारण आपल्या भारतालाच निसर्गानं भरभरून दिलंय. जणू निसर्गाचे या ठिकाणाला वरदान लाभलंय, आज आम्ही तुम्हाला भारतातील अशा एका ठिकाणाबद्दल सांगत आहोत. जिथे गेल्यावर तुम्ही तुमचे सर्व टेन्शन विसराल. सोबत तुमची पिकनिकही आठवणीतली असेल. कारण भारतीय रेल्वे (IRCTC)तुम्हाला अंदमानला फिरण्याची संधी देतेय. जाणून घ्या सविस्तर..
परदेश विसराल, जेव्हा अंदमानचा सुंदर नजारा पाहाल..!
अंदमान हे भारतातील असे ठिकाण आहे, जिथे पोहोचल्यावर तुम्हाला परदेशात असल्यासारखे वाटते. इथला स्वच्छ समुद्रकिनारा, आजूबाजूची हिरवाई आणि पांढरी वाळू असे डोळे दिपवणारे दृश्य पाहून कोणाही भुलेल.. इथे तुम्ही आल्यानंतर तुमची पिकनिक संस्मरणीय बनेल. जर अंदमान तुमच्या बकेट लिस्टमध्ये असेल, परंतु तुम्ही येथे भेट देण्याचा प्लॅन करू शकत नसाल, तर तुम्ही IRCTC सोबत प्लॅन करू शकता. सप्टेंबरमध्ये तुम्ही इथे प्रवासाचा आनंद घेऊ शकता, तेही बजेटमध्ये. टूर पॅकेजची संपूर्ण माहिती जाणून घ्या.
IRCTC कडून सप्टेंबरसाठी टूर पॅकेज
IRCTC ने अलीकडेच आपल्या सोशल मीडियावर सप्टेंबरसाठी टूर पॅकेज लाँच केले आहे, ज्यामध्ये तुम्ही अंदमानला अगदी कमी खर्चात प्रवासाचा आनंद घेऊ शकता. IRCTC ने या टूर पॅकेजची माहिती देणारे ट्विट शेअर केले आहे. ज्यामध्ये असे म्हटले आहे की जर तुम्हाला अंदमानचे भव्य दृश्य पहायचे असेल तर तुम्ही IRCTC च्या या अप्रतिम टूर पॅकेजचा लाभ घेऊ शकता.या टूर पॅकेजमध्ये विमानाच्या तिकीटापासून ते हॉटेल, खाण्यापिण्याचे पदार्थ, ट्रॅव्हल इन्शुरन्सपर्यंतच्या सुविधा उपलब्ध असतील. तुम्ही ते IRCTC च्या अधिकृत साइटवरून बुक करू शकता.
पॅकेजचे नाव- LTC स्पेशल अमेझिंग अंदमान एक्स (LTC special Amazing Andaman Ex )
पॅकेज कालावधी- 6 रात्री आणि 7 दिवस
प्रवास मोड- फ्लाइट
कव्हर केलेले डेस्टीनेशन्स- हॅवलॉक, पोर्ट ब्लेअर
तुम्ही कुठे फिरू शकता - भुवनेश्वर
तुम्ही कधी प्रवास करू शकाल - 22 सप्टेंबर 2024
या सुविधा उपलब्ध होणार आहेत
तुम्हाला राउंड ट्रिपसाठी इकॉनॉमी क्लासचे फ्लाइट तिकीट मिळेल.
राहण्यासाठी हॉटेल सुविधा उपलब्ध असतील.
या टूर पॅकेजमध्ये नाश्ता आणि रात्रीच्या जेवणाची सुविधा उपलब्ध असेल.
तुम्हाला ट्रॅव्हल इन्शुरन्सची सुविधाही मिळेल.
या प्रवासासाठी इतके शुल्क आकारले जाईल
या ट्रिपमध्ये तुम्ही एकटे प्रवास करत असाल तर तुम्हाला 71,250 रुपये मोजावे लागतील.
तर दोन लोकांना प्रति व्यक्ती 49,000 रुपये द्यावे लागतील.
तीन लोकांना प्रति व्यक्ती 48,585 रुपये शुल्क भरावे लागेल.
तुम्हाला मुलांसाठी वेगळी फी भरावी लागेल. बेडसाठी (5-11 वर्षे) तुम्हाला 44,795 रुपये द्यावे लागतील आणि बेडशिवाय तुम्हाला 42,015 रुपये द्यावे लागतील.
अशी करा बुकिंग
तुम्ही या टूर पॅकेजसाठी IRCTC च्या अधिकृत वेबसाइटवरून बुक करू शकता. याशिवाय, आयआरसीटीसी पर्यटक सुविधा केंद्र आणि क्षेत्रीय कार्यालयांमधूनही बुकिंग करता येते. पॅकेजशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही IRCTC अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकता.
हेही वाचा>>>
Travel : व्यस्त कामातून घ्या ब्रेक, 'इगतपुरीचे' निसर्गसौंदर्य पाहा, मनःशांतीचा अनुभव येईल, चित्रपटांच्या शूटिंगसाठी पहिली पसंत
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )