Travel : मदर्स डे म्हणजेच मातृदिन जवळ आलाय.. आपण नेहमी ऐकत आलोय. आईसारखे दैवत साऱ्या जगतात नाही.. खरंच आपली आई आपल्यासाठी ईश्वरच आहे. याच ईश्वराला जर तिचा ईश्वर दाखवला तर तिच्या चेहऱ्यावरील आनंद पाहण्यासारखा असेल. यंदा मातृदिन 12 मे 2024 रोजी आहे मातृदिन निमित्त जर तुम्हाला तुमच्या आईच्या चेहऱ्यावर खरा आनंद पाहायचा असेल तर भारतीय रेल्वे तुम्हाला उत्तम टूर पॅकेजची संधी देतेय. मातृदिनाच्या दिवशी तुम्ही हे पॅकेज बूक करून आईला सरप्राईझ देऊ शकता. आणि जर तुम्हाला प्रवासाची आवड असेल आणि धार्मिक प्रवासाची योजना आखत असाल तर तुमच्यासाठी ही एक उत्तम संधी आहे. भारतीय रेल्वे पर्यटन महामंडळ म्हणजेच IRCTC चार धामच्या प्रवासाचे आयोजन करत आहे. चार धाम यात्रेच्या हवाई टूर पॅकेजमध्ये तुम्हाला हरिद्वार, बरकोट, जानकी चट्टी, यमुनोत्री, उत्तरकाशी, गंगोत्री, गुप्तकाशी, सोनप्रयाग, केदारनाथ आणि बद्रीनाथला भेट देण्याची संधी मिळेल.
12 जूनपासून सुरू होणार प्रवास
हा प्रवास 12 जूनपासून सुरू होणार असून हे पॅकेज ओडिशाची राजधानी भुवनेश्वर येथून सुरू होईल. टूर पॅकेजमध्ये प्रवाशांना 11 दिवस आणि 12 रात्री घालवण्याची संधी मिळणार आहे. या पॅकेजमध्ये पर्यटकांना हॉटेलमध्ये राहणे, विमान तिकीट, खाणेपिणे आदी अनेक सुविधा मिळणार आहेत. टूर पॅकेजचे दर प्रवाशाने निवडलेल्या पर्यायनुसार असतील. पॅकेज 62,220 रुपये प्रति व्यक्ती पासून सुरू होईल.
टूर पॅकेजची खास वैशिष्ट्ये
पॅकेजचे नाव - बद्रीनाथ-केदारनाथ-गंगोत्री-यमुनोत्री (चारधाम - उत्तर भारत) भुवनेश्वर (SCBA44)
डेस्टीनेशन कव्हर - हरिद्वार, बरकोट, जानकी चट्टी, यमुनोत्री, उत्तरकाशी, गंगोत्री, गुप्तकाशी, सोनप्रयाग, केदारनाथ आणि बद्रीनाथ.
टूरची तारीख - 12 जून 2024
टूर कालावधी - 12 दिवस/11 रात्री
प्रवास - फ्लाइट
बुकिंग कसे कराल?
IRCTC वेबसाइट www.irctctourism.com ला भेट देऊन प्रवासी या टूर पॅकेजसाठी बुकिंग करू शकतात.
बुकिंग आयआरसीटीसी टुरिस्ट फॅसिलिटेशन सेंटर, झोनल ऑफिस आणि प्रादेशिक कार्यालयांद्वारे देखील केले जाऊ शकते.
पॅकेजशी संबंधित माहितीसाठी तुम्ही 8287932319 / 9110721132 या क्रमांकावर संपर्क साधू शकता.
टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )
हेही वाचा>>>