Travel : उन्हाळा सुरू असल्याने बाहेर सूर्य आग ओकतोय.. अशात कामानिमित्त बाहेर पडायचं म्हणजे घामाने शरीराची अक्षरश: लाही लाही होतेय. रोज रोज त्याच दिनचर्येचा कंटाळा आला असेल आणि तुम्ही तुमच्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढण्याचा विचार करत असाल तर भारताबाहेर कशाला? आज आम्ही तुम्हाला अशा एका हिल स्टेशन बद्दल सांगणार आहोत. जे महाराष्ट्रातील अगदी प्रसिद्ध असं हिल स्टेशन आहे. गरमीपासून हैराण झाले असाल. तर या ठिकाणाला तुम्ही अवश्य भेट दिली पाहिजे, कारण इथे आल्यानंतर तुम्ही तुमचे सर्व टेन्शन विसराल.. या ठिकाणी वीकेंडला मुंबई, पुणे, नाशिक येथून मोठ्या संख्येने लोक येथे येतात, जाणून घेऊया या ठिकाणाबद्दल..





महाराष्ट्रात वसलेले एक छोटेसे हिल स्टेशन..! 


रोजच्या धकाधकीच्या जीवनाचा कंटाळा आला असेल आणि यातून तुम्ही थोडं रिलॅक्स व्हायचा प्लॅन करत असाल तर  तुम्ही महाराष्ट्रात असलेल्या माथेरान या हिल स्टेशनला भेट देऊ शकता. महाराष्ट्रात वसलेले हे छोटेसे हिल स्टेशन खूप सुंदर आहे. येथील हिरवळ आणि सौंदर्य पर्यटकांना भुरळ घालते. दरवर्षी येथे लांबून पर्यटक येतात. तुम्हीही भेट देण्याचा विचार करत असाल तर या उन्हाळ्यात माथेरानची हिरवळ आणि सौंदर्य पाहून तुम्हाला एक वेगळीच अनुभूती मिळेल.




माथेरानला कसे जायचे?


मुंबईपासून माथेरान फक्त 110 किमी अंतरावर आहे. वीकेंडला मुंबई, पुणे, नाशिक येथून मोठ्या संख्येने लोक येथे येतात आणि येथील सौंदर्याचा आनंद लुटतात. हे ठिकाण ट्रेकिंगसाठीही खूप प्रसिद्ध आहे. माथेरान हे महाराष्ट्र राज्याच्या पश्चिम घाटावर सह्याद्रीच्या रांगेत वसलेले आहे. त्याची समुद्रसपाटीपासूनची उंची 2600 फूट आहे. 


जर तुम्हाला विमानाने इथे पोहोचायचे असेल तर मुंबई आणि पुणे विमानतळ हे जवळचे विमानतळ आहेत. माथेरानपासून या दोन विमानतळांचे अंतर अनुक्रमे 85 आणि 130 किमी आहे. 


जर तुम्हाला बस किंवा टॅक्सीने प्रवास करायचा असेल तर ट्रेनने प्रवास करूनही तुम्ही माथेरानला पोहोचू शकता. येथील सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन नेरळ जंक्शन आहे.


देशातील प्रत्येक राज्यातून या शहरासाठी बससेवा उपलब्ध आहे.


 




पर्यटकांमध्ये माथेरान का प्रसिद्ध आहे?


 माथेरानच्या जंगलात बिबट्या, हरीण, मलबार, खार, कोल्हा, रानडुक्कर आणि वानर असे प्राणी पाहायला मिळतात. सर्वात सुंदर गोष्ट म्हणजे इथली हिरवळ, जी पर्यटकांना सर्वात जास्त आवडते. याशिवाय माथेरानमध्ये तुम्ही प्रबळगड किल्ला, मंकी पॉइंट, लुईसा पॉइंट, अंबरनाथ मंदिर, शार्लोट लेक आणि इतर अनेक ठिकाणी भेट देऊ शकता.




(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )


हेही वाचा>>>


Travel : अनेकांच्या नजरेपासून दूर..! महाराष्ट्रात काश्मीरचा आनंद अनुभवायचाय? शांत, सुंदर गुप्त ठिकाणं जाणून घ्या