Vastu Shastra Blue Colour : बहुतेक लोकांना निळा (Blue) रंग खूप आवडतो. अनेकांचं वॉर्डरोब हे निळ्या रंगाच्या कपड्यांनी भरलेलं असतं. इतकंच नाही, तर हे लोक जेव्हाही काही खरेदी करायला जातात तेव्हा नेहमी निळ्या रंगाच्या वस्तूच खरेदी करत असतात. वास्तुशास्त्रानुसार, निळा रंग पाण्याशी संबंधित आहे आणि असं मानलं जातं की, निळ्या रंगात खूप सकारात्मकता असते. याशिवाय निळा रंग एकाग्रता आणि शांततेचं प्रतिक आहे. वास्तुशास्त्रानुसार (Vastu Tips) निळा रंग इतका खास का आहे? जाणून घेऊया


सकारात्मकतेसाठी करा हा उपाय


वास्तुशास्त्रात निळ्या रंगाला खूप महत्त्व आहे. निळा रंग हा पवित्रता, सकारात्मक ऊर्जा आणि शांतीचं प्रतीक आहे. जर तुम्हाला एखाद्या दिवशी खूप खराब वाटत असेल तर तुम्ही निळ्या रंगाची एखादी गोष्ट पाहत राहावी, यामुळे तुम्हाला बरं वाटेल आणि तुमच्यात सकारात्मकता येईल. याशिवाय वास्तुशास्त्रात निळ्या रंगाशी संबंधित आणखी कोणत्या गोष्टी सांगण्यात आल्या आहेत? पाहूया


तुमचे विचार होतील शुद्ध


वास्तुशास्त्रात निळ्या रंगाचा संबंध पाण्याशी आहे. ज्याप्रमाणे पाणी सतत वाहत राहते आणि त्याची पाणी निर्मळ, शुद्ध करते, त्याचप्रमाणे निळा रंग एखाद्या व्यक्तीचे नकारात्मक विचार देखील स्वच्छ करतो. निळ्या रंगात सकारात्मक ऊर्जा असते.


तणावात असाल तर मिळेल आराम


वास्तुशास्त्रात निळा रंग शांती आणि चिंतनाशीही संबंधित आहे. निळा रंग मानवी मनाला शांती देतो. जर तुम्ही नेहमी तणावात असाल तर तुमच्या घरात निळ्या रंगाच्या वस्तूंना नक्कीच स्थान द्या, यामुळे तुमचा तणाव दूर होईल आणि तुम्हाला आराम वाटेल.


संवाद कौशल्य सुधारतील


जर तुम्ही तुमच्या जीवनात निळ्या रंगाचा समावेश केला तर त्यामुळे तुमची संवाद साधण्याची आणि व्यक्त होण्याची क्षमता मजबूत होते. घरात अभ्यास करताना किंवा लेखन क्षेत्रातील व्यक्तींनी जास्तीत जास्त निळ्या रंगाचा वापर करावा.


या दिशांना ठेवा निळ्या वस्तू


निळा रंग उत्तर आणि पूर्व दिशांना संतुलित करतो. वास्तुशास्त्रात या दिशांना सकारात्मक ऊर्जेशी जोडलेलं आहे. जर तुम्ही घराच्या उत्तर किंवा पूर्व दिशेला निळे पडदे, फर्निचर किंवा इतर कोणत्याही निळ्या रंगाची वस्तू ठेवली तर तुमच्या जीवनात सकारात्मक ऊर्जा येते, अशी मान्यता आहे.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा: 


Vastu Tips : 'निज पत्राहुनि लघुतर त्रिभुवन अशी माय तुळशी', चुकूनही तुळशीजवळ ठेऊ नका 'या' वस्तू; अन्यथा येईल अठरा विश्वे दारिद्र्य