Travel : एप्रिल- मे मध्ये कडक उन्हाळा, विश्रांती घेण्यासाठी बाहेर फिरायला जायचंय? तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. कारण जर तुम्ही एप्रिल- मे मध्ये (April) कुठेतरी प्रवास करण्याचा विचार करत असाल तर भारतीय रेल्वेचे (IRCTC) खास पॅकेजेस आहेत. या पॅकेजेससह जेव्हा तुम्ही प्रवास कराल तेव्हा तुम्हाला प्रवास करण्यासाठी हॉटेल्स आणि कॅबची चिंता करावी लागणार नाही. कारण खाद्यपदार्थांपासून ते पॅकेजपर्यंत, तुमच्या सर्व सुविधांची भारतीय रेल्वेकडून काळजी घेतली जाते. भारतीय रेल्वे पॅकेजसह तुम्ही एकाच वेळी अनेक ठिकाणांना भेट देऊ शकता. जाणून घ्या सविस्तर


 


चेरापुंजी, गुवाहाटी, काझीरंगा, मावलिनॉन्ग आणि शिलाँग टूर पॅकेज


हे पॅकेज 6 रात्री आणि 7 दिवसांचे आहे, ज्यामध्ये तुम्हाला चेरापुंजी, गुवाहाटी, काझीरंगा, मावलिनॉन्ग आणि शिलाँग येथे नेले जाईल.
हे पॅकेज 11 एप्रिलपासून चंदीगड येथून सुरू होत आहे.
तुम्हाला 6:40 मिनिटांनी फ्लाइट मिळेल.


पॅकेज फी - दोन लोकांसह प्रवास करण्यासाठी प्रति व्यक्ती शुल्क 46700 रुपये आहे.
तीन जणांनी एकत्र प्रवास केल्यास प्रति व्यक्ती शुल्क 44800 रुपये आहे.
जर तुम्ही मुलांसोबत प्रवास करत असाल तर तुम्हाला 39650 रुपये वेगळे द्यावे लागतील.
जर तुम्ही मुलांसाठी स्वतंत्र बेड घेत नसाल तर फी 34100 रुपये आहे.
फक्त 44800 रुपयांमध्ये फ्लाइट तिकीट, हॉटेलचा खर्च आणि जेवणाचा खर्च समाविष्ट आहे.


 




 


कन्याकुमारी, मदुराई, मल्लिकार्जुन, रामेश्वरम, तिरुपती आणि त्रिवेंद्रम टूर पॅकेजेस


या पॅकेजसाठी तुम्ही अंबाला, चंदीगड, हजरत निजामुद्दीन, जालंधर सिटी, कर्नाल, कुरुक्षेत्र, लुधियाना आणि पानिपत जंक्शन येथून ट्रेन घेऊ शकता.


हे पॅकेज 18 एप्रिलपासून सुरू होत आहे.
हे पॅकेज एकूण 12 रात्री आणि 13 दिवसांसाठी आहे.
पॅकेज फी - दोन ते तीन लोकांसह प्रवास करत असल्यास, प्रति व्यक्ती शुल्क 39,610 रुपये आहे.
जर तुम्ही मुलांसोबत प्रवास करत असाल तर तुम्हाला 35,650 रुपये वेगळे द्यावे लागतील.
यामध्ये तुमचे हॉटेल, प्रवास आणि जेवणाचा खर्च समाविष्ट आहे.


 




गुलमर्ग, पहलगाम, सोनमर्ग आणि श्रीनगर टूर पॅकेज


हे पॅकेज 12 एप्रिलपासून हैदराबादपासून सुरू होत आहे.


हे 5 रात्री आणि 6 दिवसांचे टूर पॅकेज आहे.
या पॅकेजसह तुम्ही फ्लाइटने प्रवास करू शकाल.
पॅकेज फी - दोन लोकांसह प्रवास करण्यासाठी प्रति व्यक्ती शुल्क 52930 रुपये आहे.
तीन लोकांसह प्रवास करण्यासाठी प्रति व्यक्ती शुल्क 51300 रुपये आहे.
जर तुम्ही मुलांसोबत प्रवास करत असाल तर तुम्हाला 37990 रुपये वेगळे द्यावे लागतील.
या पॅकेज फीमध्ये फ्लाइट तिकीट, हॉटेलचा खर्च, जेवणाचा खर्च आणि प्रेक्षणीय स्थळांचा खर्च समाविष्ट आहे.


 


(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )


हेही वाचा>>>


Travel : आकर्षक ट्रॅव्हल पॅकेजना भुललात? सावध व्हा, महागात पडू शकतं, बुकिंग करण्यापूर्वी 'या' गोष्टी लक्षात ठेवा