Government Job Recruitment 2024 : 12वी पास (12th) उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. इंटरमिजिएट पास तरुणांसाठी केंद्र सरकारच्या (Central Government) कंपनीत नोकरी (Job) मिळवण्याची सुवर्णसंधी आहे. नेवेली लिग्नाईट कॉर्पोरेशन लिमिटेड (NLC इंडिया), म्हणजेच NLC इंडिया लिमिटेड हा केंद्र सरकारचा उपक्रम आहे. ही भारत सरकारमार्फत नव्यानेच तयार करण्यात आलेली कंपनी आहे. लिग्नाइट कोळशाची ही सर्वात मोठी खाण असून ती तामिळनाडूमध्ये आहे. या ठिकाणी नोकरीसाठी वेगवेगळ्या पदांकरिता अर्ज मागविण्यात आले आहेत. तरी, या नोकरीसाठी अर्ज कसा करायचा ते पाहूयात. 


कोणत्या पदासाठी किती भरती? (nlc Vacancy)


नेवेली लिग्नाईट कॉर्पोरेशन लिमिटेडने औद्योगिक कामगार, लिपिक सहाय्यक आणि कनिष्ठ अभियंता अशा विविध पदांसाठी अर्ज मागवले आहेत. या ठिकाणी एकूण 34 पदे रिक्त आहेत. यामध्ये कनिष्ठ अभियंता 8 पदे, लिपिक सहाय्यक 17 पदे, औद्योगिक कामगार 9 पदांचा समावेश आहे. या पदांसाठी अर्ज 25 मार्च 2024 पासून सुरू झाले आहेत, 24 एप्रिल 2024 पर्यंत उमेदवार अर्ज करू शकतात. 


पात्रता काय असणार? (Qualification)


नेवेली लिग्नाईट कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये कनिष्ठ अभियंता पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे अभियांत्रिकी पदवीचं प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे. तसेच, लिपिक सहाय्यकांसाठी, उमेदवाराकडे कोणतीही पदवी असली पाहिजे, तर औद्योगिक कामगारांसाठी, तो आयटीआयसह 12 वी उत्तीर्ण असावा.


वयोमर्यादा (Age)


विशेष बाब म्हणजे, जरी नियमानुसार राखीव प्रवर्गासाठी सूट देण्याची तरतूद असली तरी या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 30 वर्षांपेक्षा जास्त नसावे.


पगार किती असणार? (Salary)


नेवेली लिग्नाईट कॉर्पोरेशन लिमिटेडमधील कनिष्ठ अभियंत्यांचे सुरुवातीचे वेतन 38000 रुपये निश्चित करण्यात आले आहे. तर, औद्योगिक कामगार आणि लिपिक सहाय्यकांसाठी निवडलेल्या उमेदवारांना 30000 रुपये पगार मिळणार आहे. 


अर्ज भरण्यासाठी किती शुल्क भरावे लागतील?


कनिष्ठ अभियंता पदासाठी अर्ज करण्यासाठी, सामान्य श्रेणीसाठी शुल्क 595 रुपये आहे, तर ST, SC आणि माजी सैनिकांसाठी 295 रुपये आहे. लिपिक सहाय्यक आणि औद्योगिक कामगारांच्या पदांसाठी अर्ज करण्यासाठी, सामान्य श्रेणीतील उमेदवारांना 486 रुपये आणि एससी एसटी इत्यादी उमेदवारांना 236 रुपये भरावे लागतील.


तरी, केंद्र सरकारकडून सुरु असणाऱ्या या विविध पदांच्या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी येत्या 24 एप्रिल 2024 पर्यंत अर्ज करावेत असं सांगण्यात आलं आहे. 


महत्त्वाच्या बातम्या : 


Police Bharti : पोलीस भरतीसाठी तयारी करणाऱ्या तरुणांसाठी गुड न्यूज; अर्ज करण्याची मुदत वाढवली, 'ही' आहे शेटवची तारीख