Travel : असं म्हणतात, स्वित्झर्लंड (Switzerland) हे ठिकाण पृथ्वीवरील स्वर्ग आहे. हे तितकचं खरंय, कारण अभूतपूर्व निसर्गसौंदर्य, प्रदुषणमुक्त वातावरण, माणसांची कमी वर्दळ असं ठिकाण म्हणजे स्वर्गसुखच जणू, हनिमून कपल्ससाठी तर हे बेस्ट डेस्टीनेशन (Best Destination) मानले जाते. अनेक लोकांना त्यांच्या बजेटमुळे स्वित्झर्लंडला जाता येत नाही, पण चिंता करू नका, आपल्या भारतातही असं ठिकाण आहे, आणि तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल, अशी ठिकाणं एक नाही तर तब्बल 4 आहेत. जाणून घेऊया त्या बद्दल...


 


पंतप्रधानांनाही या ठिकाणाची भूरळ पडली!


स्वित्झर्लंड हे जगातील सर्वात सुंदर पर्यटन स्थळांपैकी एक आहे. प्रत्येकाला एकदा तरी तिथे जायचं असते. हा देश पर्यटकांसाठी आकर्षक ठरत आहे, इथले भव्य स्विस आल्प्स, सुंदर नद्या आणि तलाव हे सर्व तुम्हाला अनुभवता येते. पण तुम्ही स्वित्झर्लंडच्या सहलीवर जेवढा खर्च कराल, त्यापेक्षा खूपच कमी किंमतीत तुम्ही भारतात चार मिनी स्वित्झर्लंड पाहू शकता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या ठिकाणाला स्वित्झर्लंडपेक्षा सुंदर पर्यटन स्थळ बनवण्याची घोषणा केली होती. याचं कारण खुद्द पंतप्रधानांनाही या ठिकाणांची भूरळ पडली, त्याबद्दल जाणून घ्या..


 





खज्जियार


हिमाचल प्रदेशातील हे एक अतिशय सुंदर ठिकाण आहे. हे एक छोटेसे गाव आहे आणि भारतातील मिनी स्वित्झर्लंडच्या यादीत सर्वात वरचे ठिकाण आहे. खज्जियार तलाव पाहिल्यानंतर तुम्हाला चित्रपटांमध्ये पाहिलेली सुंदर दृश्ये आठवतील. याशिवाय इथले निसर्गसौंदर्य मन मोहून टाकणारे आहे. ट्रेकप्रेमींसाठी हे ठिकाण खूप आवडते आहे. रोजच्या धावपळीने कंटाळला असाल तर इथे नक्की जा.




औली


भारताचे दुसरे मिनी स्वित्झर्लंड हे उत्तराखंडचे औली शहर आहे. उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यातील हे ठिकाण पर्यटकांसाठी खूप प्रसिद्ध आहे. स्कीइंग आणि हिमवर्षावाचा आनंद घेण्यासाठी हजारो पर्यटक येथे येतात. इथे सगळीकडे फोटोजेनिक ठिकाणं आहे. येथून कैलास मानसरोवरची यात्रा सुरू होते.


 





जम्मू आणि काश्मीर


भारताचा मिनी स्वित्झर्लंड हा विषय असून त्यात जम्मू-काश्मीरचा उल्लेख नाही. असं शक्यच नाही... हिवाळ्यात येथे बर्फाची पांढरी चादर पाहायला मिळते. अनेक बॉलीवूड चित्रपटांचे शूटिंग येथे झाले आहे. परदेशातूनही अनेक पर्यटक येथे येतात. श्रीनगर, गुलमर्ग, पहलगाम हे खास पर्यटकांचे आकर्षण आहे.


 




मणिपूर


जर तुम्ही स्वित्झर्लंडला जाण्याचा विचार करत असाल, तर तेथे पैसा खर्च करण्याऐवजी तुम्ही मणिपूरचा पर्याय निवडू शकता. मणिपूरला भारताचे स्वित्झर्लंड असेही म्हणतात. त्याचे सौंदर्य जगभर प्रसिद्ध आहे. कांगलेपाटी, लोकटक तलाव ही प्रसिद्ध पर्यटन स्थळे आहेत.


 


 


(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )


हेही वाचा>>


 


Travel : विदेशातील 'थायलंड' विसराल, जेव्हा भारतातील 'मिनी थायलंड' पाहाल, कमी बजेटमध्ये अनुभवा स्वर्गसुख!