Travel : चार धाम यात्रा ही जगातील सर्वात पवित्र तीर्थक्षेत्रांपैकी एक आहे. हिंदू धर्मात चारधाम यात्रा अत्यंत महत्त्वाची मानली जाते. मान्यतेनुसार चारही धामांच्या दर्शनाने मोक्ष प्राप्त होतो. यामुळे हिंदू धर्माशी संबंधित प्रत्येक व्यक्तीला कधी ना कधी चारधामला जायचे असते. यमुनोत्री, गंगोत्री, केदारनाथ आणि बद्रीनाथ ही चार मंदिरं यात समाविष्ट आहेत. याशिवाय आणखी एक चार धाम आहे ज्याची स्थापना आदि शंकराचार्यांनी केली होती. यामध्ये उत्तराखंडमधील बद्रीनाथ, गुजरातमधील द्वारका, ओरिसातील पुरी आणि तामिळनाडूमधील रामेश्वरम या देशाच्या चार वेगवेगळ्या कोपऱ्यांमधील चार पवित्र तीर्थक्षेत्रांचा समावेश आहे. जर तुम्ही या पवित्र यात्रेला भेट देण्याचा प्लॅन करत असाल तर भारतीय रेल्वेचे पॅकेज बुक करा.  या पॅकेजेसमध्ये प्रवाशांसाठी हॉटेल आणि जेवणासह सर्व सुविधांची काळजी घेतली जाते. 


 


कोणत्याही त्रासाशिवाय प्रवास करायचा असेल तर...


10 मेपासून चार धाम यात्रा सुरू होत आहे. यात्रेसाठी 15 एप्रिलपासून नोंदणी सुरू झाली आहे. केदारनाथ, गंगोत्री, यमुनोत्रीचे दरवाजे 10 मेपासून तर बद्रीनाथचे दरवाजे 12 मेपासून उघडतील. अशात चार धामला भेट द्यायची इच्छा असलेल्या लोकांसाठी भारतीय रेल्वेची खास ऑफर आहे. जर तुम्हाला कोणत्याही त्रासाशिवाय प्रवास करायचा असेल तर तुम्ही भारतीय रेल्वेच्या पॅकेजने जाऊ शकता. भारतीय रेल्वेने प्रवाशांच्या सोयीसाठी अनेक पॅकेजेस आणली आहेत. यामध्ये तुम्हाला फक्त पॅकेज तिकीट बुक करावे लागेल, त्यानंतर भारतीय रेल्वे चार धाम यात्रेशी संबंधित सर्व तयारी करेल.


 





मुंबईहून चार धाम यात्रेसाठी टूर पॅकेज


हे पॅकेज 11 मे पासून सुरू होणार आहे.
पॅकेजमध्ये तुम्हाला बद्रीनाथ, बरकोट, गंगोत्री, गुप्तकाशी, हरिद्वार, जानकी चट्टी, केदारनाथ, सोनप्रयाग, उत्तरकाशी आणि यमुनोत्रीला भेट देण्याची संधी मिळेल.
हे धार्मिक टूर पॅकेज 11 रात्री आणि 12 दिवसांसाठी आहे.
पॅकेजसाठी तुम्ही 11.05.2024, 18.05.2024 आणि 25.05.2024 ची तिकिटे बुक करू शकता.
या पॅकेजमध्ये तुम्हाला फ्लाइटने प्रवास करण्याची संधी मिळणार आहे.
पॅकेज फी - दोन लोकांसोबत प्रवास करत असल्यास प्रति व्यक्ती पॅकेज फी 72600 रुपये आहे.
तीन लोकांसह प्रवास करण्यासाठी प्रति व्यक्ती पॅकेज शुल्क 66800 रुपये आहे.
पॅकेजमध्ये तंबू आणि हॉटेलची सुविधा भारतीय रेल्वेकडून दिली जाईल.




 
अहमदाबाद आणि हरिद्वार येथून चार धाम यात्रेसाठी टूर पॅकेज



तुम्ही 8 जून रोजी या पॅकेजसाठी तिकीट बुक करू शकाल.
हे पॅकेज 13 रात्री आणि 14 दिवसांसाठी आहे.
पॅकेजमध्ये तुम्हाला हरिद्वार, बरकोट, जानकीछट्टी, यमुनोत्री, उत्तरकाशी, गंगोत्री, गुप्तकाशी, सोनप्रयाग, केदारनाथ, बद्रीनाथ येथे नेले जाईल.
पॅकेज फी - दोन लोकांसोबत प्रवास करण्यासाठी प्रति व्यक्ती पॅकेज फी 39000 रुपये आहे.


 


(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Travel : ''प्रवाशांनो कृपया लक्ष द्या.. दिल्ली ते नेपाळला फिरण्याची सुवर्णसंधी!'' भारतीय रेल्वेचे सर्वात स्वस्त पॅकेज, 15 जूनपासून प्रवास सुरू होईल