Vitamin Deficiency : अनेकदा एकाच स्थितीत (Position) जास्त वेळ बसल्यावर अचानक हाताला, पायांना मुंग्या येतात, पाय जड होतात आणि प्रचंड वेदनाही होतात. पण कधी असा विचार केला आहे का की हाता पायांना या मुंग्या नेमक्या कोणत्या कारणामुळे येतात? तुमच्या हाता-पायांना मुंग्या येण्याची अनेक कारणे असू शकतात जसे की, व्हिटॅमिनची कमतरता, मधुमेह आणि शरीरात वाढलेले कोलेस्ट्रॉल. परंतु, सामान्यतः, या संवेदनाचे मुख्य कारण शरीरात व्हिटॅमिन बी आणि व्हिटॅमिन ईची कमतरता असू शकते. या कमतरतेमुळे शरीरावर विशेषतः हाता-पायांवर मुंग्या चढल्याचा भास होतो. या परिस्थितीत, हात किंवा पाय हलवले जात नाहीत, तसेच वेदना जाणवतात. अशा वेळी या समस्येवर मात कशी करता येईल या संबंधित माहिती या ठिकाणी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. 


या मुंग्या घालवण्यासाठी आहारात काही बदल करण्याबरोबरच आवश्यक ती खबरदारी घेणे गरजेचे आहे. तसेच, हात आणि पायांची संवेदना दूर करण्यासाठी खालील टिप्स तुम्ही फॉलो करू शकता. 


1. स्प्राउट्स आणि वनस्पती तेल हे शाकाहारी लोकांसाठी चांगले पर्याय आहेत. 


2. व्हिटॅमिन बीची कमतरता पूर्ण करण्यासाठी सूर्यफूल तेल आणि राजमा देखील खाऊ शकता. 


3. व्हिटॅमिन ईची कमतरता भरून काढण्यासाठी आहारात अॅव्होकॅडोचा समावेश केला जाऊ शकता. 


4. सुक्या मेव्यामध्ये व्हिटॅमिन ई देखील चांगले असते. विशेषतः बदामामध्ये व्हिटॅमिन ई भरपूर प्रमाणात असते.  


5. हात पाय जोडून बसल्यावर मुंग्या येत असतील तर सरळ करा. 


6. हाता पायांना मुंग्या आल्यावर एकाच जागी बसून न राहता चालण्याचा प्रयत्न करा. 


7. जेव्हा तुम्हाला तुमच्या हातात मुंगी चढल्यासारखे वाटत असेल तेव्हा तुमची मूठ बंद करा आणि नंतर ती उघडा. थोडा हातांची अशी हालचाल केल्यास तुम्हाला आराम वाटेल.


8. पायांच्या संवेदनामध्ये, पंजे पुढे आणि मागे हलवा. ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे मुंग्या येत असल्यास, या हालचालीमुळे हे दुखणे कमी होईल. 


9. मुंग्या येण्याच्या काही मिनिटांतच आंघोळ करावी लागत असेल, तर गरम पाण्याऐवजी थंड पाण्याने आंघोळ करावी. अशाने तुम्हाला काही काळ आराम वाटेल. 


10. अनेकदा पायांत घातल्या जाणाऱ्या घट्ट बुटांमुळेदेखील हा त्रास होतो. कारण बुटांमुळे तुमचा रक्तप्रवाह रोखला जातो. त्यामुळे जास्त वेळ बूट पायांत न ठेवता ठराविक अंतराने पायांत घाला. 


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.


महत्वाच्या बातम्या : 


Knee Pain Remedies: हिवाळ्यात जाणवते गुडघेदुखीची समस्या? फॉलो करा या सोप्या टिप्स