Yogasana In Winter : हिवाळ्यात (Winter Tips) बदलत्या ऋतूमानानुसार शरीराची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. पण, थंडीमुळे शरीरात सतत आळसपणा येतो आणि काहीच काम न करण्याची इच्छा होते. मात्र, दिवसभर अंथरूणात राहिल्याने किंवा काहीच काम न केल्यानेसुद्धा ते शरीराला हानिकारक ठरू शकते. या साठीच हिवाळ्यात निरोगी आणि फ्रेश वाटण्यासाठी आम्ही तुमच्यासाठी काही खास टिप्स घेऊन आलो आहोत, ज्यामुळे तुम्हाला उत्साही वाटेल आणि तुमचे शरीर दिवसभर सक्रिय राहील.


आहारतज्ज्ञ किंवा डॉक्टरांच्या मते, हिवाळ्यात आहार आणि व्यायामाकडे अधिक लक्ष देणे गरजेचे आहे. जर तुम्हाला रोज व्यायामासाठी जिममध्ये जाण्याचा कंटाळा येत असेल तर तुम्ही घरी राहूनसुद्धा आरामात करू शकता अशी तीन योगासने आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. याच्या मदतीने तुम्ही तुमच्या शरीरातील वेदनाही दूर करू शकता. 


हिवाळ्यात ही तीन योगासने करावीत.


1. पदहस्तासन (पुढे वाकणे)




हे योगासन केल्याने हृदय मजबूत होते. आणि हृदयात रक्ताचा प्रवाह व्यवस्थित होतो. यासोबतच पोटाची चरबी कमी करण्यासोबतच पोटाशी संबंधित समस्या दूर करण्यासाठी आणि उंची वाढविण्याचे काम करते. 


2. अधोमुख श्वानासन (Dog Pose) :




हे योगासन केल्याने पोटाच्या खालच्या भागाचे स्नायू मजबूत आणि टोन्ड होतात. यासोबतच पाठीचा कणाही मजबूत असतो. हे आसन शरीरासाठी इतके चांगले आहे की ते तुमच्या संपूर्ण शरीरात रक्त परिसंचरण सुधारते. असे केल्याने हाता-पायांचे दुखणे बरे होते. तसेच ते टोन्ड आहेत. यकृत आणि किडनीशी संबंधित आजारही बरे होतात. 


3. चक्रासन (wheel pose) :




हे योगासन केल्याने वजन नेहमी नियंत्रणात राहते. तसेच शरीर लवचिक असते. त्याचे फायदे असे आहेत की, असे केल्याने ते टाईप 2 मधुमेहामध्ये फायदेशीर ठरते. आणि पाठीचा कणा सरळ राहतो. 


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.


महत्त्वाच्या बातम्या :


Health Tips : गुलाबी थंडीत 'या' चहाने तुमच्या दिवसाची सुरुवात करा; प्रतिकारशक्ती वाढविण्याबरोबरच व्हायरलपासूनही संरक्षण मिळेल