हिंदू धर्मात दिवाळीच्या (Diwali 2021) सणाला विशेष महत्त्व आहे. पाच दिवस चालणारा हा दीपोत्सव (Deepotsav 2021) संपूर्ण भारतात साजरा केला जातो. दिवाळीच्या सणात साजरा करण्यात येणाऱ्या लक्ष्मीपूजनाला (Laxmi Pujan 2021) मोठं महत्व दिलं जातं. लक्ष्मीपूजनाच्या पहाटे सूर्योदयापूर्वी उठून अभ्यंग स्नान केला जातो. सायंकाळी घरातील सगळे सदस्य एकत्र येऊन लक्ष्मी पूजन करतात. मात्र, यावर्षी साजरा करण्यात येणाऱ्या लक्ष्मीपूजनाबाबत पंचागकर्ते मोहन दाते (Mohan Date) यांनी महत्वाची माहिती दिलीय.
आजपासून दिपावलीच्या पावन पर्वाला सुरुवात झालीय. 1 ते 6 नोव्हेंबर दरम्यान दिवाळी साजरी करण्यात येणार आहे. यंदाच्या वर्षी नरकचर्तुदर्शी आणि लक्ष्मीपूजन हे एकाच दिवशी (4 नोव्हेंबर) साजरे करण्यात येणार आहे. साधारणत: नरक चर्तुदर्शी आणि लक्ष्मीपूजन हे वेगवेगळ्या दिवशी येतात. मात्र, यावर्षी नरकचर्तुदर्शीच्या दिवशीच अमावस्या असल्याने त्याच दिवशी संध्याकाळी लक्ष्मीपूजन करण्यात येईल, अशी माहिती पंचागकर्ते मोहन दाते यांनी दिलीय.
दिवाळीच्या सणानिमित्त प्रत्येकजण आपपल्या दारात तेलाचे लहान दिवे आणि आकाशकंदील लावतात. ज्यामुळे संपूर्ण घर विद्यूत रोषणाईने उजळून निघते. याचबरोबर घराबाहेर रांगोळी काढून सुशोभन केले जाते. दरम्यान, लहानांपासून तर, थोरांपर्यंत सर्वच दिवाळीचा आनंद घेतात. दिवाळी या पवित्र सणाला वाईटावर चांगल्याच्या विजयाचं प्रतिक मानलं जातो. काही लोकांची अशी श्रद्धा आहे की, भगवान रामचंद्र चौदा वर्षांचा वनवास संपवून सीतेसह अयोध्येला परत आला, तो याच दिवसात. पण त्यावेळी त्याचे स्वरूप आजच्यापेक्षा खूपच भिन्न होते. प्राचीन काळी हा यक्षांचा उत्सव मानला जायचा. अंधार दूर करुन प्रकाशाचे अस्तित्व निर्माण करणारा दीप मांगल्याचे प्रतीक मानला जातो. याच्या प्रकाशाने आपल्या जीवनातील अंधकार दूर व्हावा म्हणून हा दीपोत्सव साजरा केला जातो.
संबंधित बातम्या-