Diwali 2021: दरवर्षीप्रमाणे यंदाही लोक दिवाळी सणाची वाट उत्सुकतेने पाहात आहेत. लोक उत्साहाने आणि आनंदाने दिवाळी साजरी करतात. अनेक जण दिवाळीला नातेवाईकांना आणि मित्रमैत्रिणींना भेटवस्तू देतात. दिवाळीला गोड पदार्थ खायला अनेकांना आवडते. वेगवेगळ्या प्रकारच्या मिठाई लोक दिवाळीला खरेदी करत असतात. बरेच वेळा मिठाई ही भेसळयुक्त असू शकते. मिठाईमध्ये रंग मिसळला जातो. जाणून घेऊयात भेसळयुक्त मिठाई कशी ओळखावी...

  
मिठाईमधील खवा
मिठाई तयार करताना खव्याचा वापर केला जातो. या खव्यामध्ये देखील भेळमिसळ असू शकते. त्यासाठी खव्यामध्ये 2 ते 3 थेंब आयोडीन टाकावे. जर खवा काळा पडला तर त्यामध्ये भेळमिसळ केली आहे असे समजावे. खवा दाणेदार असेल तरी देखील तो खराब असू शकतो. 



दिवाळीला मिठाई तयार करताना दूधाचा वापर केला जातो.  दूधामध्ये थोडे पाणी घालून ते मिक्स करावे. जर फेस तयार झाला तर असे समजावे की दूधामध्ये डिटर्जंट मिस्क केले आहे. सिंथेटिक दूधाला ओळखण्यासाठी दूधागरम पाणी टाका. जर दूधाचा रंग हलका पिवळा झला, तर ते दूध सिंथेटिक आहेस, असे समजावे. मिठाईमध्ये तूप देखील जास्त प्रमाणात वापरले जाते. आयोडीन टिंचरचे दोन थेंब तूपामध्ये टाका जर तूपाचा रंग निळा होत असेल तर त्यामध्ये भेळमिसळ  केली आहे, असं समजावे. 


दिवाळीच्या पदार्थांमध्ये लाल तिखट पावडर देखील वापरली जाते. जाणून घेऊयात भेसळयुक्त लाल तिखट ओळखण्याची पद्धत
 
 भेसळयुक्त लाल तिखट पावडर ओळखण्याची सोपीपद्धत 
1 एका ग्लासमध्ये पाणी घ्या 
2. त्यामध्ये एक चमचा लाल तिखट पावडर टाका 
3 पाण्यामधून थोडी पावडर काढून हाताला लावा 
5 हातावर तुम्हाला रंग जाणवेल 
6 जर तुम्हाला या पावडरमध्ये साबणासारखा चिकटपणा जाणवत असेल तर त्यामध्ये साबण मिसळा आहे. 
अशा प्रकारे तुम्ही भेसळयुक्त लाल तिखट पावडर ओळखू शकता.


Hair care tips: काळेभोर आणि चमकदार केस हवेत? घरच्या घरी तयार करा हा हर्बल शॅम्पू


Diwali 2021 Skin Care: फेस्टिव्ह सीझनमध्ये ग्लोइंग स्किनसाठी ट्राय करा 'या' सोप्या टिप्स