Sanjori Recipe : गणेशोत्सवाची सध्या सर्वत्र धामधूम सुरू आहे. गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी भाविक घरोघरी जात आहेत. दोन वर्षांच्या खंडानंतर यावर्षी पुन्हा एकदा बाप्पाचं आगमन झाल्याने सगळ्यांमध्ये उत्साह आहे. बाप्पासाठी खास दररोज गोडाधोडाचे पदार्थ बनवले जात आहेत. पण बाप्पाच्या नैवेद्यासाठी दररोज कोणता पदार्थ बनवावा असा प्रश्न गृहिणींना पडतो. तर आज जाणून घ्या सांजोरी (Sanjori) बनवण्याची कृती...
सांजोरीसाठी लागणारे साहित्य -
- रवा - 2 वाट्या
- गूळ - 2 वाट्या
- तूप - 1 ते 2 वाटी
- खोवलेलं ओलं खोबरं - 1 ते 2 वाटी
- वेलची पावडर - 2 चमचे
- दूध - 4 वाट्या
- कणिक - 3 वाट्या
- तेल - 2 चमचे
- मीठ - 1/4 चमचा
सांजोरी बनवण्याची कृती
- कणिक, मीठ आणि तेल एकत्र करून त्यात थोडं पाणी घालून छान मऊसूत पीठ भिजवून घ्या.
- भिजवलेलं पीठ थोडावेळ झाकून ठेवा.
- रवा आणि तूप एकत्र करून माध्यम आचेवर 8-10 मिनिटे भाजून घ्या.
- त्यात थोडे थोडे दूध घालून ढवळून घ्या.
- झाकण ठेवून एक वाफ काढून घेऊन त्यात खोबरं आणि गूळ घालून मंद आचेवर सांजा शिजवून घ्या.
- मंद आचेवर गूळ विरघळेपर्यंत सांजा ढवळत राहा.
- वेलची पूड घालून सांजा ढवळून घेऊन थंड करून घ्या.
- या सांज्याचे छोटे गोळे करून, ते कणकेच्या पारित भरून गोल सांजोरी लाटून घ्या.
- तव्यावर मध्यम आचेवर दोन्ही बाजूने छान खरपूस भाजून घ्या.
कोरोना काळानंतर यावर्षी सगळेच सण, उत्सव मोठ्या धूमधडाक्यात साजरे केले जात आहेत. त्यामुळे आपल्या लाडक्या बाप्पाचं स्वागत करण्यासाठी गणेश भक्तांमध्येही मोठ्या प्रमाणात उत्साह पाहायला मिळतो आहे. घरोघरी जल्लोषात बाप्पाचं स्वागत करण्यात येत आहे.
संबंधित बातम्या