Rice Kheer Recipe : दोन वर्षानंतर घरोघरी जल्लोषात गणपती बाप्पाचं आगमन झालं आहे. बाप्पाच्या आगमनानंतर गौरींचे (Gauri Pujan 2022) माहेरवाशीणीसारखे स्वागत केले जाते. तिच्यासाठी गोडाधोडाचे जेवण केले जाते. त्यामुळ बाप्पा आणि गौरीच्या नैवेद्यासाठी कोणता पदार्थ बनवावा असा प्रश्न गृहिणींना पडतो. तर जाणून तांदळाची खीर बनवण्याची सोपी पद्धत...
तांदळाच्या खीरसाठी लागणारे साहित्य
- दूध - एक लिटर
- तांदूळ - 1 वाटी
- साखर - 100 ग्रॅम
- वेलची - 1 चमचा
- केशर - आवश्यकतेनुसार
- बदाम - 7 ते 8
- मनुका- 5 ते 6
तांदळाची खीर बनवण्याची कृती
- तांदळाची खीर बनवण्यासाठी एक वाटी तांदूळ जाडसर वाटून घ्यावे.
- वाटलेले तांदूळ 10 ते 15 मिनिटं भिजत ठेवा.
- दरम्यान एका भांड्यात दूध उकळवून घ्यावे.
- दूध उकळल्यानंतर त्यात केसर मिक्स करावे.
- त्यानंतर त्या दुधामध्ये भिजलेले तांदूळ मिक्स करावे. तांदूळ चांगल्या पद्धतीनं शिजू द्यावे.
- दूध घट्ट झाल्यानंतर त्यात साखर मिक्स करावी. त्यानंतर मनुके, बदाम आणि चवीनुसार वेलची टाकावी.
- तयार झालेलं मिश्रण दोन ते तीन मिनिटांसाठी शिजू द्यावे.
- स्वादिष्ट खीर तयार झाल्यानंतर गॅस बंद करा.
कोरोना काळानंतर यावर्षी सगळेच सण, उत्सव मोठ्या धूमधडाक्यात साजरे केले जात आहेत. त्यामुळे आपल्या लाडक्या बाप्पाचं स्वागत करण्यासाठी गणेश भक्तांमध्येही मोठ्या प्रमाणात उत्साह पाहायला मिळतो आहे. घरोघरी जल्लोषात बाप्पाचं स्वागत करण्यात येत आहे.
गौरीचे स्वागत कसं करावं?
गौराई आली सोन्याच्या पावलांनी, माणिक मोत्याचा पावलांनी असे म्हणत गौरी माहेरवाशीण म्हणून येते. त्या दिवशी दारात रांगोळी काढून, लक्ष्मीची पावले काढून, ताट आणि चमचा वाजवत गौरीचे मुखवटे घरात आणले जातात. त्यांना छान दागिने, फुलांचे हार, नव्या साड्या नेसून गौरीला सजवले जाते. तिला गोडाधोडाचे जेवण केले जाते. यामध्ये 16 भाज्या, पंचपक्वान्न असा बेत केला जातो.
संबंधित बातम्या