Tourist Place In India : भारतात फिरण्यासाठी अनेक अद्भुत ठिकाणे असली, तरी अशी काही खास ठिकाणे आहेत, जिथे नेहमीच पर्यटकांची गर्दी असते. यातील अनेकांची नावे युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीतही समाविष्ट आहेत. यामध्ये अनेक ऐतिहासिक वास्तू, किल्ले आणि लेण्यांचा समावेश आहे. आम्‍ही तुम्‍हाला अशाच काही रंजक ठिकाणांबद्दल सांगणार आहोत, जिथली वारसा आणि संस्कृती पर्यटकांना सर्वाधिक आकर्षित करते.


ताजमहाल


आग्रा येथे असलेला ताजमहाल जगातील सात आश्चर्यांपैकी एक आहे. हा इस्लामिक डिझाइनचा एक सुंदर नमुना आहे, ज्यामध्ये कमान, मिनार आणि घुमट यासह अनेक गोष्टींचा समावेश आहे. यमुना नदीच्या काठी बांधलेला ताजमहाल पांढऱ्या संगमरवरी दगडाने बनलेला आहे.


लाल किल्ला


शहाजाने 1648 मध्ये लाल किल्ला बांधला. लाल किल्ला बांधण्यासाठी लाल वाळूचा दगड वापरण्यात आला आहे. ही ऐतिहासिक वास्तू सुमारे दोन किलोमीटरच्या परिघात पसरलेली आहे. या वास्तूळा दोन मुख्य दरवाजे आहेत, ज्यांची नावे 'लाहोर गेट' आणि 'दिल्ली गेट' अशी आहेत.


आमेर किल्ला, जयपूर


आमेर किल्ला 1592मध्ये बांधला गेला. किल्ल्यावरील जलेब चॉक, शिला देवी मंदिर या गोष्टी विशेष पाहण्यासारख्या आहेत. यासोबतच त्यात एक मोठा हॉल देखील आहे, ज्याला दिवाण-ए-आम म्हणतात.


गेटवे ऑफ इंडिया, मुंबई


मायानगरी मुंबईत बांधलेला 26 मीटर उंचीचा ‘गेटवे ऑफ इंडिया’ अरबी समुद्राच्या सौंदर्याला आणखी खुलवतो. मुंबईच्या खास पर्यटन स्थळांमध्ये त्याची गणना होते. इंडो-सारासेनिक डिझाइनसाठी प्रसिद्ध असलेळा गेटवे ऑफ इंडिया बांधण्यासाठी पिवळा बेसाल्ट आणि काँक्रीट वापरण्यात आले आहे.


एलोरा लेणी, औरंगाबाद  


युनेस्को जागतिक वारसा स्थळांत सामील या लेणी पाचव्या आणि सहाव्या शतकात बौद्ध, जैन आणि हिंदू ऋषींनी बांधल्या होत्या. त्यात कोरीव मठ, पूजा घरे आणि मंदिरे आहेत, ज्यापैकी 12 बौद्ध धर्माचे, 17 हिंदू आणि 5 जैन धर्माचे आहेत.


म्हैसूर पॅलेस, कर्नाटक  


1897 मध्ये लागलेल्या भीषण आगीनंतर म्हैसूर पॅलेसचा तीन मजली पॅलेस पूर्णपणे पुन्हा बांधण्यात आला. राजवाड्याच्या आत चौकोनी मिनार आणि घुमट आहेत.


मेहरानगड किल्ला, जोधपूर  


15व्या शतकात बांधलेला मेहरानगड किल्ला हा भारतातील सर्वात मोठा तटबंदी असणारा किल्ला आहे. जोधपूरच्या लोकांच्या सुरक्षेचा विचार करून हा किल्ला तयार करण्यात आला होता. किल्ल्यावर एक संग्रहालय देखील आहे, ज्यात राजे-महाराजांशी संबंधित कलाकृतींचा संग्रह आहे.


कुतुबमिनार, नवी दिल्ली  


राजधानी दिल्लीत बांधण्यात आलेल्या कुतुबमिनारचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळातही समावेश आहे. हा 73 मीटर उंच टॉवर कुतुबुद्दीन-ऐबकने 1193 मध्ये दिल्लीच्या शेवटच्या हिंदू राज्याच्या पराभवानंतर बांधला होता. कुतुबमिनारमध्ये पाच वेगवेगळे मजले आहेत.


हेही वाचा :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha