Morning Yoga for Health : उत्तम आरोग्यासाठी आणि मनःशांतीसाठी योगा करणं खूप महत्त्वाचा आहे. यामुळे वजन कमी होते. पचनक्रिया सुधारते, आणि जर तुम्हाला पोटाच्या चरबीचा त्रास होत असेल तर ते कमी करण्यासही योगा फायदेशीर ठरतो. पण, स्त्रिया अनेकदा कामात इतक्या व्यस्त असतात की त्यांना स्वतःसाठी वेळ काढता येत नाही. अशा महिलांना जर योगा करायचा असेल तर आम्ही तुम्हाला असे काही योग सांगत आहोत जे तुम्ही अगदी सहज करू शकता. 


वज्रासन


वज्रासनामुळे तुम्हाला अनेक फायदे मिळू शकतात. वज्रासन रोज केल्याने पचनक्रिया सुधारते. त्यामुळे बद्धकोष्ठता आणि आम्लपित्त दूर होण्यास मदत होते. तसेच शरीराचे स्नायू मजबूत होतात.


वज्रासन कसे करायचे?



  • वज्रासन करण्यासाठी, सर्वात आधी गुडघे मागे वाकवा.

  • गुडघे एकमेकांजवळ ठेवा.

  • लक्षात ठेवा की तुमचे दोन्ही पाय एकमेकांना स्पर्श होता कामा नये.

  • डोकं, मान आणि पाठीचा कणा एका सरळ रेषेत ठेवा.

  • आपले तळवे आपल्या मांडीवर ठेवा.


बालासन


दररोज ही मुद्रा केल्याने रक्तप्रवाह सुधारतो. ओटीपोटाचे स्नायू मजबूत होतात आणि पोटातील आणि आजूबाजूची चरबी कमी होते. यामुळे तणावातूनही आराम मिळतो.


बालासन कसे करायचे?



  • वज्रासन आसनात बसा आणि पाठीचा कणा सरळ ठेवा.

  • श्वास घेताना दोन्ही हात वर करा.

  • श्वास सोडताना कंबरेचा वरचा भाग पुढे वाकवा, तसेच दोन्ही हात वाकवा.

  • हात सरळ ठेवा आणि डोके जमिनीवर ठेवा.

  • 30 सेकंदांपर्यंत या आसनात बसा.


पश्चिमोत्तनासन


पश्चिमोत्तनासन केल्याने तुम्हाला अनेक फायदे मिळतात. त्यामुळे तणाव कमी होतो. ते पोटाची चरबी काढून टाकण्यास उपयुक्त आहेत. तसेच हाडांमध्ये लवचिकता आणण्यास मदत होते. हे आसन चांगल्या पचनासाठी देखील खूप फायदेशीर आहे.


पश्चिमोत्तनासन कसे करायचे?



  • सर्वप्रथम दंडासनाच्या आसनात या.

  • आता तुमचे गुडघे थोडेसे वाकवा आणि पाय पुढे पसरवा.

  • हात वर करा आणि पाठीचा कणा सरळ ठेवा.

  • आता श्वास सोडा आणि हे करत असताना तुमचे नितंब पुढे वाकवा.

  • हात खाली करा आणि हाताची बोटे धरा.

  • गुडघ्यांना नाकाने स्पर्श करण्याचा प्रयत्न करा, 10 सेकंद या आसनात रहा.


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.


महत्वाच्या बातम्या : 


Workout Tips : चुकीच्या पद्धतीने केलेले 'हे' वर्कआउट केवळ फायदाच नाही तर नुकसानही देतात, जाणून घ्या कसे?