Pushpa Hindi Box Office Collection : दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनच्या (Allu Arjun) पुष्पा द राइज  (Pushpa The Rise) या सिनेमाने बॉक्सऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घातला आहे. सिनेमातील डायलॉगलेखील प्रचंड व्हायरल होत आहेत. आता 'पुष्पा' सिनेमाने एसएस राजामौलीच्या 'बाहुबलीचा' रेकॉर्ड मोडला आहे. सिनेमात अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना मुख्य भूमिकेत आहेत. या सिनेमाने हिंदींत 100 कोटींचा टप्पा पार केला आहे. 


कोरोनाकाळातदेखील अल्लू अर्जुनचे चाहते सिनेमा पाहण्यासाठी सिनेमाागृहात जात आहेत. पुष्पा सिनेमाने हिंदीत 100 कोटींचा टप्पा पार केला आहे. रमेश बाला यांनी ट्वीट करत यासंदर्भात माहिती दिली आहे. त्यांनी लिहिले आहे, पुष्पा सिनेमाने हिंदीत 100 कोटींची कमाई केली आहे. अल्लू अर्जुन आणि त्याच्या टीमने केलेली ही चांगली कामगिरी आहे.





 बाहुबलीचे तोडले रेकॉर्ड
अल्लू अर्जनच्या 'पुष्पा' सिनेमाने सहाव्या आठवड्यात प्रभासच्या बाहुबली सिनेमाचे रेकॉर्ड मोडले आहेत. बाहुबली सिनेमाने हिंदीत 5.38 कोटींची कमाई केली होती. तर दुसरीकडे अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा' सिनेमाने सहाव्या आठवड्यात सहा कोटींची कमाई केली आहे.  


अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदानाच्या पुष्पा सिनेमाचा दुसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाची प्रेक्षक प्रतीक्षा करत आहेत. पुष्पा सिनेमातील गाणीदेखील सुपरहिट झाली आहेत. यूजर्स या गाण्यांवर रील बनवत आहेत. या गाण्यांचे रील इंस्टाग्रामवर व्हायरल होत आहेत.


'पुष्पा' बनणार होती वेब सिरीज
काही वर्षांपूर्वी आंध्र प्रदेशातील लाल चंदनाच्या लाकडाच्या तस्करीचे प्रकरण चर्चेचा भाग बनले होते. सुकुमार यांनी या विषयावर संशोधन केले. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी सांगितले की, या प्रकरणाचा शोध घेण्यासाठी त्यांना सहा महिने लागले.  आधी यावर वेब सिरीज बनवणार असल्याचे ठरले होते. पण नंतर सिनेमा बनवण्याचा निर्णय घेतला. 


संबंधित बातम्या


Happy Birthday Preity Zinta : दोनवेळा मृत्यूला परतवलं, त्सुनामीत गमावले जवळचे मित्र, प्रीती झिंटाच्या आयुष्यातल्या ‘या’ गोष्टी माहितीयेत का?


Tu Tevha Tashi : 'तू तेव्हा तशी' म्हणत स्वप्नील जोशी आणि शिल्पा तुळसकरच छोट्या पडद्यावर पुनरागमन!


Cheslie Kryst Suicide : ‘मिस अमेरिका 2019’ चेल्सी क्रिस्टची आत्महत्या, इमारतीवरून उडी घेत संपवलं आयुष्य


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha