Health Care : अनेकांना अंबट चिंच खायला आवडते. पाणीपुरी खाताना अनेक लोक चिंचेचं पाणी आवर्जुन पुरीमध्ये टाकायला सांगतात. चिंच ही आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असते. चिंचेमध्ये व्हिटॅमिन, मिनरल्स आणि फायबर असते. तुम्हाला जर वजन कमी (weight loss) करायचे असेल तर तुम्ही चिंचेच्या ज्यूसचा आहारात समावेश करू शकता. जाणून घेऊयात चिंचेच्या ज्यूसचे फायदे-

वजन कमी होईलचिंचेच्या ज्यूमध्ये माइल्ड ड्यूरेटिक गुण असतात. जे शरीरातील विषाक्त पदार्थ शरीराच्या बाहेर टाकतात. फायबर असणाऱ्या या चिंचेच्या ज्यूसचे सेवन केल्यानंतर तुम्हाला काही तास भूक लागत नाही. त्यामुळे वजन कमी होते. 

कोलेस्ट्रॉल कमी होईलचिंच खाल्ल्यानं  कोलेस्ट्रॉल लेव्हल  कंट्रोलमध्ये राहते. तसेच पाचन क्रिया देखील सुधारते.  त्वचा चांगली होईलचिंचेचा ज्यूस प्यायल्यानं त्वाचेला पोषण मिळते.  चिमंचेच्या ज्यूसमध्ये व्हिटॅमिन-सी असते. ज्यामुळे त्वचेचे  टेक्स्चर चांगले होते आणि त्वाचे संबंधित समस्या दूर होतात. 

अशा प्रकारे तयार करा हा ज्यूस चिंच स्वच्छपणे धुवा आणि त्यामधील बिया काढून टाकादोन ग्लास पाणी गरम करा. त्यामध्ये ही धुतलेली चिंच टाका. चिंच भिजल्यानंतर हे पाणी गाळणीचा वापर करून पाणी गाळून घ्या. आता चिंचेचा आर्क त्या पाण्यात उतरला असेल. पाणी थंड झल्यानंतर त्या पाण्यामध्ये मध टाका आणि ते पाणी दिवसातून दोन वेळा प्या. 

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

महत्वाच्या बातम्या : 

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha