Diwali Sweets For Sugar Patients : दिवाळी (Diwali 2022) हा दिव्यांचा, उत्साहाचा सण तर आहेच. पण, त्याचबरोबर दिवाळीत फराळ आणि मिठाईवर ताव मारणाऱ्यांची संख्याही काही कमी नाही. लहानांपासून ते अगदी वृद्धांपर्यंत सगळ्यांनाच फराळ आणि मिठाई खायला आवडते. मात्र, आरोग्याच्या अभावी अनेकांना मिठाईचा आस्वाद घेता येत नाही. मिठाईमध्ये असणारे साखरेचे अतिरिक्त प्रमाण तसेच यामुळे होणारा त्रास यापासून अनेकजण मिठाई खाण्यापासून दूर राहतात. मात्र, या ठिकाणी आम्ही तुम्हाला अशा काही मिठाईची नावं सांगणार आहोत ज्यामुळे तुम्ही दिवाळीला कुटुंबियांबरोबरच मिठाईचा आनंद देखील लुटू शकता.
या ठिकाणी अशा काही मिठाई आहेत ज्या तुम्ही घरी अगदी सहज बनवू शकता. मात्र, याबरोबरच तुम्हाला तुमच्या आरोग्याशी संबंधित काही महत्त्वाच्या गोष्टींची काळजी घ्यावी लागेल.
मधुमेहाच्या रुग्णांनी दिवाळीत 'या' गोष्टी लक्षात ठेवा
- साखरेची पातळी तपासत राहा
- वेळेवर औषधे घ्या
- व्यायाम थांबवू नका
- रात्री उशिरापर्यंत जागणे टाळा
मधुमेहाचे रुग्ण कोणती मिठाई खाऊ शकतात?
मधुमेहाच्या रूग्णांसाठी काही 5 मिठाईंची नावे आहेत. जी मधुमेही रुग्ण आरामात खाऊ शकतात. फक्त प्रमाणाची काळजी घ्या आणि उत्साहात अति खाणे टाळा.
1. अंजीर बर्फी
अंजीरापासून बनवलेली बर्फी ही एक अशी मिठाई आहे, जी शुद्ध पद्धतीने बनवली तर त्यात साखर अजिबात वापरली जात नाही. कारण अंजीर स्वतः खूप गोड असते तसेच ही बर्फी तयार करण्यासाठी मधाचा वापर केला जातो. त्यामुळे ते पूर्णपणे नैसर्गिक आहे. या बर्फीचे तुम्ही 2 ते 3 नग खाऊ शकता.
2. पांढरा रसगुल्ला
दिवाळीत तुम्ही पांढरा रसगुल्ला देखील खाऊ शकता. रसगुल्ल्यांमध्ये जरी साखरेचे प्रमाण जास्त असले तरी तुम्ही रसगुल्ल्यातील अतिरिक्त पाणी हलक्या दाबाने काढून खाऊ शकता. मात्र, प्रमाणावर नियंत्रण ठेवावे लागेल.
3. शुगर फ्री लाडू
तुम्ही बाजारातून शुगर फ्री लाडू खरेदी करू शकता किंवा घरीही तयार करू शकता. या लाडूंमध्ये साखर सोडून सर्व मिश्रण घाला. साखरेऐवजी, लाडू तयार करण्यासाठी तुम्ही मध वापरू शकता. मात्र, एका दिवसात दोनपेक्षा जास्त लाडू खाऊ नका.
4. घरी बनवा मखना खीर
तुम्ही घरी बनवलेली खीर देखील घेऊ शकता. दुधात मखना टाकून मिक्सरमध्ये बारीक करून घ्या. त्यांचे प्रमाण असे ठेवावे की दूध घट्ट पेस्टसारखे होईल. त्यात बदाम, काजू, अक्रोड आणि बेदाणे टाका आणि फ्रीजमध्ये ठेवा. थंड झाल्यावर थोडे थोडे खा.
5. मधात बनवलेली फेणी
मधात बनवलेली फेणी ही पारंपारिक पद्धत आहे. दिवाळीत ही मिठाई भरपूर विकली जाते. तुम्ही मधात तयार केलेली फेणी खाऊन दिवाळीचा आनंद घेऊ शकता.
महत्त्वाच्या बातम्या :
Diwali 2022 : दिवाळीत अभ्यंगस्नानाला आहे विशेष महत्त्व; जाणून घ्या उटणे लावण्याचे फायदे