Diwali 2022 : दिवाळीत मिठाई खरेदी करताना 'या' गोष्टींची विशेष काळजी घ्या

दिवाळी (Diwali 2022) हा प्रकाश आणि आनंदाचा सण आहे. येत्या 21 ऑक्टोबरपासून दिवाळीचा सण सगळीकडे साजरा केला जाणार आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
आता सण म्हटला की गोडाधोडाचे पदार्थ, मिठाई, फराळ या गोष्टी आपसूकच आल्या. याच निमित्ताने बाजारात आपल्याला वेगवेगळ्या मिठाईंची व्हेरायटी पाहायला मिळते.

मात्र, याचबरोबर भेसळीचे प्रकारही या दरम्यान होत असतात. त्यामुळे जेव्हाही तुम्ही बाजारात मिठाई खरेदी करण्यासाठी जाल तेव्हा काही गोष्टी लक्षात ठेवा, जेणेकरून तुमची दिवाळी आनंदी आणि सुरक्षित दिवाळी होईल.
तुम्ही जर बाजारातून मिठाई विकत घेणार असाल तर तुम्हाला अनेक रंगीबेरंगी मिठाई पाहायला मिळतील. मात्र, या सुंदर दिसणार्या मिठाईपासून दूर रहा.
कारण या मिठाईमुळे अॅलर्जी, किडनीचे आजार आणि श्वसनाचे आजार यांसारखे आजार होऊ शकतात. त्यामुळे रंगीबेरंगी मिठाई खरेदी करणे आणि खाणे टाळावे हे लक्षात ठेवा.
बाजारात अनेक मिठाईंवर चांदीचा वर्क जास्त दिसून येतो. हा चांदीचा वर्क फार आकर्षित करणारा असतो. त्यामुळे अनेकदा या मिठाईवर चांदीचे काम झाले आहे असे वाटते. परंतु, यामुळे गोंधळून जाऊ नका.
कारण आजकाल भेसळ करणारे मिठाई सुंदर बनवण्यासाठी चांदीऐवजी अॅल्युमिनियमचा वापर करतात, जे आरोग्यासाठी घातक आहे. त्यामुळे अशा मिठाई टाळल्या पाहिजेत.
सणासुदीच्या काळात मिठाईमध्ये भेसळयुक्त मावा अगदी सहजपणे वापरला जातो. जे आपल्या आरोग्याला हानी पोहोचवतात. अशा परिस्थितीत दिवाळीची मिठाई खरेदी करताना विश्वासू किंवा चांगल्या दुकानातूनच खरेदी करा. माव्यात दुधाच्या पावडरची भेसळ करणे आरोग्यास हानिकारक आहे.
माव्यातील भेसळ समजत नसेल तर त्यावर आयोडीनचे दोन ते तीन थेंब टाकून पहा. माव्याचा रंग निळा झाला तर समजून घ्या की त्यात भेसळ झाली आहे. त्यामुळे दिवाळीला घरीच मिठाई बनवण्याचा प्रयत्न करा . बाजारातून मिठाई घेणार असाल तर भेसळयुक्त मिठाईपासून दूर राहा.