Surya Grahan 2022 : वर्षातील पहिले सूर्यग्रहण 30 एप्रिल 2022 रोजी म्हणजेच शनिवारी होणार आहे. हे सूर्यग्रहण दुपारी 12:15 वाजता सुरू होईल आणि 1 मे रोजी पहाटे 04:07 वाजता संपेल. या काळात विशेष काळजी घ्यावी. ग्रहण काळात गर्भवती महिलांनी नेमकी कोणती काळजी घ्यावी ? कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात जाणून घ्या.
सूर्यग्रहणाचा प्रभाव :
ज्योतिषशास्त्रानुसार, सूर्यग्रहणाचा प्रभाव जगातील प्रत्येकावर कोणत्या ना कोणत्या प्रकारे प्रभावित होतो. त्याचा परिणाम चांगला आणि वाईट दोन्ही असू शकतो. ग्रहणकाळात सूर्यापासून निघणाऱ्या हानिकारक किरणांचा माणसाच्या जीवनावर परिणाम होतो. या हानिकारक किरणांचा सर्वाधिक परिणाम गरोदर महिला आणि बालकांवर होतो. त्यामुळे या लोकांना विशेष खबरदारी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
सूर्यग्रहणाच्या वेळी, गर्भवती महिलांनी अत्यंत काळजी घेणे आवश्यक आहे. कारण असे मानले जाते की, ग्रहण काळात त्यांनी कधीही घराबाहेर पडू नये. कारण यावेळी बाहेर पडणारे हानिकारक किरण त्यांच्या आरोग्यास हानी पोहोचवू शकतात.
अशा गोष्टी वापरू नका :
गरोदर महिलांनी सूर्यग्रहण काळात कोणत्याही तीक्ष्ण वस्तूंचा वापर करू नये. कारण असे केल्याने बाळामध्ये विकृती निर्माण होऊ शकते असे मानले जाते. यावेळी त्यांनी कोणत्याही प्रकारचे शिवणकाम किंवा भरतकाम करू नये. सूर्यग्रहण काळात गर्भवती महिलांनी भाजीपाला कापणे, कपडे शिवणे आणि तीक्ष्ण किंवा धारदार हत्यारे वापरणे टाळावे. यामुळे मुलामध्ये शारीरिक दोष निर्माण होऊ शकतात.
सूर्यग्रहण काळात हे उपाय करा :
- सूर्यग्रहणाचे दुष्परिणाम टाळण्यासाठी गर्भवती महिलेच्या जिभेवर तुळशीचे पान ठेवा आणि हनुमान चालीसा आणि दुर्गा स्तुतीचे पठण करा.
- सूर्यग्रहण संपल्यानंतर गर्भवती महिलेने आंघोळ केली पाहिजे, अन्यथा तिच्या बाळाला त्वचेचे आजार होऊ शकतात.
- या दरम्यान गर्भवती महिलांनी मानसिक जप करावा. जन्मलेल्या बाळाच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर याचा चांगला परिणाम होतो.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. यासाठी संबंधित तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा.)
महत्वाच्या बातम्या :