Nitesh Rane on Abdul Sattar : भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांचा आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याकडे सवाल उपस्थित केला आहे. नितेश राणे यांनी अब्दुल सत्तार यांचा 2017 मधील जुना व्हिडीओ व्हायरल करत महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे. सत्तार यांनी या व्हिडीओमध्ये प्रभू हनुमानाबद्दल आक्षेपार्ह भाषा वापरली आहे. यावरून नितेश राणे यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे.
नितेश राणे यांनी मुख्यमंत्र्यांना आव्हान देत म्हटलं आहे की, हिंमत असेल तर हनुमानाचा अपमान करणाऱ्या अब्दुल सत्तारांना अटक करा, असं म्हटलं आहे. नितेश राणे यांनी अब्दुल सत्तार यांचा आक्षेपार्ह व्हिडीओ ट्विट करत महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे. हा व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे. अब्दुल सत्तार यांच्या जोरदार टीका करण्यात येत आहे. भाजपकडून अब्दुल सत्तार यांच्यावर कारवाईची मागणी करण्यात येत आहे.
प्रभू हनुमानाबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या सत्तारांवर कारवाई कधी असा सवाल भाजप आमदार नितेश राणे यांनी उपस्थित केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अब्दुल सत्तारांवर लवकरात लवकर कारवाई करावी अशी मागणी राणे यांनी केली आहे. ''मुख्यमंत्री उद्वव ठाकरे यांच्यामध्ये हिंमत असेल तर त्यांनी अब्दुल सत्तारांना तुरुंगात टाकावं'', असं वक्तव्य नितेश राणे यांनी केलं आहे. त्यांनी मुख्यमंत्र्यांना आव्हान केलं आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Kirit Somaiya : सोमय्यांसह भाजपचं शिष्टमंडळ राज्यपालांची भेट घेणार, पोलिसांवर खोटी FIR दाखल केल्याचा आरोप
- Mumbai : भाज्यांचे दर कडाडले, गृहिणींचं बजेट कोलमडलं
- Aurangabad : मित्राच्या लग्नात तलवार घेऊन बेधुंद डान्स, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर एकाला बेड्या
- Coronavirus Cases India : देशात गेल्या 24 तासांत 2,927 नवे कोरोनाबाधित, 32 जणांचा मृत्यू