Solar Eclipse 2022 : 2022 वर्षातील पहिले सूर्यग्रहण 30 एप्रिल रोजी होणार आहे. हे आंशिक सूर्यग्रहण असेल. रात्रीची वेळ असल्याने हे ग्रहण भारतात पाहता येणार नाही. हे अमेरिकेच्या काही भागांसह अंटार्क्टिकामध्ये दृश्यमान असेल.

Continues below advertisement

आर्यभट्ट रिसर्च इन्स्टिट्यूट ऑफ ऑब्झर्वेशनल सायन्स (एआरआयईएस) चे माजी संचालक आणि ज्येष्ठ सौर वैज्ञानिक डॉ. वहाबुद्दीन यांनी सांगितले की, यावर्षी फक्त दोनच सूर्यग्रहण होणार आहेत. 30 एप्रिलला पहिले सूर्यग्रहण होणार आहे. हे ग्रहण भारतात मध्यरात्री 12:15 वाजता सुरू होईल आणि पहाटेच्या आधी 04:07 वाजता संपेल. हे सूर्यग्रहण भारतात नसून अटलांटिक, अंटार्क्टिका, दक्षिण अमेरिकेचा दक्षिण-पश्चिम भाग आणि पॅसिफिक महासागरात दिसणार आहे.

सूर्यग्रहणाच्या दिवशी काय करावे ?

Continues below advertisement

असे मानले जाते की, सूर्यग्रहणाच्या दिवशी अन्नपदार्थांवर तुळशीला घातल्याने ते दूषित होत नाहीत. याशिवाय भगवान सूर्याच्या उपासनेसाठी मंत्र-जप किंवा पठण इ. मंत्रजप केल्याने नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. यासोबतच संपत्ती, शांती आणि सिद्धी यासाठी मंत्रांचा जप करावा.

सूर्यग्रहणाच्या दिवशी चुकूनही 'या' गोष्टी करू नका 

सूर्यग्रहणाच्या वेळी पचनशक्ती कमजोर होते, त्यामुळे सूर्यग्रहण काळात अन्न खाऊ नये. ग्रहणाच्या वेळी स्वतःचे आणि विशेषतः गर्भवती महिलांनी ग्रहणाच्या सावलीपासून संरक्षण केले पाहिजे. याशिवाय सूर्याकडे पाहणे टाळावे. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. यासाठी संबंधित तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा.) 

महत्वाच्या बातम्या :