मुंबई: डेंग्यू हा डासांच्या प्रादुर्भावामुळे होणारा रोग आहे. हा रोग चारप्रकारे व्हायरल होऊ शकतो. ताप, सर्दी, खोकला, डोळ्यांची आग, गुडघे दुखी आदी काही डेंग्यूची लक्षणं आहेत. त्यामुळे डेंग्यूवर अनेकवेळा लवकर उपाय मिळत नाहीत. याची लक्षणं स्पष्ट झाल्यानंतरच यावर उपचार करता येतात.

 

खरेतर डेंग्यूचे डास दिवसाच्या प्रकाशात घरात किंवा घराबाहेर कुठेही चावू शकतात. पण जर रात्री घरातील लाइट सुरू राहिल्यास तरीही हे डास तुमच्यावर हल्ला करू शकतात.

 

त्यामुळे डेंग्यूसाठी प्रतिबंध राखणे हाच त्यापासून वाचण्याचा उपाय आहे.

 

डेंग्यूपासून वाचण्याचे काही उपाय

 

1) डास प्रतिबंधात्मक उपायांचा वापर करावा

 

2). रात्री झोपताना फुल शर्ट आणि विजारीचा वापर करावा

 

3). खिडकीचे पडदे स्वच्छ आणि सुरक्षित असल्याची खात्री करून घ्यावी.

 

4). पावसाळ्याच्या दिवसात डेंग्यूच्या संसर्गाचे प्रमाण जास्त असल्याने एअर कंडीशनच्या खोलीत झोपावे.

 

5). तसेच घरात पाणी विनाकारण जमा होऊ देऊ नये. यामुळे डेंग्यूच्या डासांचा प्रादुर्भाव मोठ्याप्रमाणात होतो.

 

6). पिण्याचे पाणी साठवणारे पिंप, डेरा आठवड्यातून एकदा स्वच्छ करावा.

 

7). डेंग्यूचा संसर्ग टाळण्यासाठी पीडित रुग्णाला मच्छरदाणीतच झोपू द्यावे.

 

8). सूर्योदय आणि सुर्यास्तावेळी घरातच राहावे. कारण याकाळातच डेंग्यूच्या डासांचा प्रादुर्भाव जास्त असतो.

 

9). दरवाजे आणि खिडकींची योग्य तपासणी करुन घेऊन, दरवाजांच्या फटी लांबीने भराव्यात.