Stomach Problem : अनेकवेळा आपल्याला असे जाणवले असेल की, पोटातून गुडगुड असा आवाज येतो, या आवाजाकडे आपण दुर्लक्ष करतो. तुम्हाला माहित आहे का की, पोटातून असे आवाज येणे अनेक आजारांचे लक्षण देखील असू शकते. तसं, पोटातून आवाज येणे ही एक सामान्य गोष्ट आहे. कधी कधी पोट रिकामे असताना देखील असा आवाज येतो.


पोटात गॅस झाला असेल, तरी असा आवाज येतो. पोटात बिघाड असतानाही हा त्रास होतो. पण, औषधे घेतल्यानंतरही पोटात असा आवाज येत असेल, तर ते कॅन्सरसारख्या धोकादायक आजाराचे लक्षणही असू शकते. पोटात बराच वेळ असा त्रास होत असेल, तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या. सामान्यतः पोटात गुडगुड असा आवाज का येतो, ते जाणून घेऊया...


गॅसची समस्या


जर, तुम्हाला गॅसची समस्या असेल, तर पोटातून असा आवाज येणे सामान्य गोष्ट आहे. आतड्यात वायू साठतो, तेव्हा असे होते. या दरम्यान अनेक वेळा पोटातून गुडगुड असा आवाज येऊ लागतो. गॅस पास झाला तर, हे आवाज बंद होतात. ही समस्या टाळण्यासाठी तेलकट आणि साखरयुक्त पदार्थ खाणे टाळा.


रिकामे पोट


कधी कधी खूप वेळ भूक लागल्यावर पोटातून विचित्र आवाज येऊ लागतात. जर, तुम्हाला पोटात खूप आवाज येत असेल, तर ती सुक्रोज आणि ग्लूटेनची ऍलर्जी देखील असू शकते. जर, जास्त समस्या असेल तर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता.


पोटात असा आवाज येणे सामान्य आहे का?


जर तुमच्या पोटात गुडगुड किंवा कोणत्याही प्रकारचा आवाज येत असेल, तर अचानक घाबरून जाण्याची गरज नाही. हे अगदी सामान्य आणि नैसर्गिक आहे. परंतु, जर तुम्हाला पोटदुखी, मळमळ आणि उलट्या सोबत पोटात आवाज येत असेल, तर मात्र डॉक्टरांचा सल्ला घ्या. यामुळे पोटात काही प्रकारचे जिवाणू संसर्ग होऊ शकतो.


जर, गॅसमुळे असा आवाज येत असेल, तर तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. यासाठी रोज सकाळी थोडावेळ चालण्याचा व्यायाम करा. जेवणात अशा गोष्टी खा, ज्यामुळे पोटात गॅसचा त्रास होणार नाही. सोड्याचे सेवन कमी करा.


हेही वाचा :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha