Farhan Akhtar And Shibani Dandekar Wedding Rituals: शिबानी दांडेकर (Shibani Dandekar) आणि फरहान अख्तर (Farhan Akhtar) खूप दिवसांपासून एकमेकांना डेट करत आहेत. आता हे ‘पॉवर कपल’ लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत. मेहंदी सोहळ्यासोबतच दोघांच्या लग्नाच्या विधींनाही सुरुवात झाली आहे. फरहान आणि शिबानीच्या लग्नाबाबत विविध प्रकारच्या चर्चा सुरू आहेत.
अनेक रिपोर्ट्समध्ये दावा केला जात आहे की, हे जोडपे मुस्लिम पद्धतीने ‘निकाह’ करणार आहेत, तर काहींनी ते महाराष्ट्रीयन रितीरिवाजानुसार लग्न करणार असल्याचं म्हटलं आहे. मात्र, अद्याप अधिकृतपणे काहीही उघड झालेले नाही. आता या सगळ्या चर्चांमध्ये या जोडप्याच्या लग्नाशी संबंधित एक नवीन माहिती समोर आली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर ना निकाह वाचणार आहेत आणि ना मराठी रितीरिवाजानुसार लग्न करणार आहेत. त्यापेक्षा दोघांनीही आपलं लग्न वेगळ्या पद्धतीनं करावं, असा विचार केला आहे.
साधे आणि पेस्टल रंगाचे कपडे घालण्याचे आवाहन
लग्न अतिशय शांतपणे आणि साध्या पद्धतीने व्हावे, अशी शिबानी आणि फरहान दोघांचीही इच्छा आहे. नव्या रिपोर्टनुसार, शिबानी आणि फरहान दोघांनाही आपलं लग्न अगदी साध्या पद्धतीने करायचं आहे. यासाठी त्यांनी पाहुण्यांना साधे आणि पेस्टल रंगाचे कपडे घालून येण्याची विनंतीही केली आहे. फरहान आणि शिबानीला त्यांच्या वैवाहिक जीवनाची अति चर्चा होऊ नये, असे वाटते आहे.
प्रेम धार्मिक परंपरेपेक्षा वरचढ!
फरहान मुस्लिम आणि शिबानी हिंदू आहेत. यामुळेच त्यांना धार्मिक भेदभाव होऊ नये असे वाटते. निकाह किंवा लग्न याऐवजी त्यांनी एक हटके पद्धत निवडली आहे. त्यांनी आपली एकमेकांकडून असणाऱ्या इच्छा आणि अपेक्षा लिहून काढल्या आहेत. या इच्छा आता 19 फेब्रुवारीला म्हणजे त्यांच्या लग्नाच्या दिवशी ते वाचणार आहेत. शिबानी आणि फरहानला ओळखणाऱ्यांना हे चांगलंच माहीत आहे की, दोघांचं प्रेम धार्मिक परंपरेपेक्षा वरचढ आहे. यासाठी दोघांनी एकमेकांना पूर्ण स्वातंत्र्य दिले आहे.
हेही वाचा :
- Disha Patani : 80 किलो वजन उचलून दिशाचं वर्कआऊट; टायगरची बहिण आणि आई म्हणाली...
- Madhuri Dixit : 'हे' गाणं पाहण्यासाठी माधुरी बुरखा घालून गेली चित्रपटगृहात ; सांगितला किस्सा
- Rashmika Mandanna-Vijay Deverakonda : विजय देवरकोंडासोबत जोडलं जातंय रश्मिकाचं नाव ; लग्नाबाबत नॅशनल क्रश म्हणाली...
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha